Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळ आजपासून सेवेत; पहिलं विमानही दाखल, पाहा नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्यं!
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून पॅसेंजर सुविधा सुरू होणार आहे.

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport) आजपासून (25 डिसेंबर) पॅसेंजर सुविधा सुरू होणार आहे. दिवसभरात एकूण 30 विमानांची येजा होणार असून 4 हजार प्रवाशी याचा लाभ घेणार आहेत. पुढील 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल.
सद्या देशपातळीवरील विमान सेवा सुरू होणार असून मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात सुरू होत असलेल्या विमानतळावरून वर्षाला 2 कोटी पर्यंत प्रवासी विमानसेवेचा लाभ घेणार आहेत. नवी मुंबई विमानतळावर सद्या दोन धावपट्ट्या अस्तित्वात आहेत. पुढील काळात तिसरी धावपट्टी उभारली जाणार आहे. यानतंर जगातील सर्वात जास्त प्रवासांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाला मान मिळणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या विमानकंपण्या सेवा देणार आहेत. (Passenger services have commenced from Navi Mumbai International Airport)
#WATCH | Maharashtra: Navi Mumbai International Airport to begin operations today
— ANI (@ANI) December 25, 2025
A passenger, Ram Prasad, says, "We came from Bangalore, and we booked this trip specifically to explore the Navi Mumbai airport.... First of all, I thank Mr Adani. He came and welcomed all the… https://t.co/1zXMD15il4 pic.twitter.com/R1yAOQFf5t
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्यं काय? (What are the features of Navi Mumbai Airport?)
- विमानतळ उभारणीस एकूण खर्च 1 लाख कोटींहून जास्त झाला आहे.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे.
- जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत.
- पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे.
- टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.
- नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.























