एक्स्प्लोर

Sudhakar Badgujar : ठाकरेंच्या हकालपट्टीनंतर बडगुजर कोणत्या पक्षात जाणार? निर्णय घेण्यावरती स्पष्टच बोलले, 'भाजप वरिष्ठ पातळीवर...'

Sudhakar Badgujar : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर आता भाजपमध्ये जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पक्षांतरांच्या चर्चेवरती आज सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.त्यानंतर नाशिकच्या राजकारण मोठी खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना भाजप पक्षाने आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. ते शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर आता भाजपमध्ये जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पक्षांतरांच्या चर्चेवरती आज सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

सुधाकर बडगुजर यांनी पक्षांतरांची भूमिका मांडताना म्हटलं की, मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. मी कार्यकर्ते आणि समर्थकांशी बोलून निर्णय घेईल. भाजप वरीष्ठ पातळीवर काय हालचाली चालू आहेत ते माहिती नाही. मी पक्षात प्रवेश करताना कोणत्याही अटी शर्ती लावणार नाही. सीमा हिरे यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. सर्व पक्षातून बोलवणं आहे, कुठं जायचं ते ठरवू, येणाऱ्या काळात पुढची दिशा ठरवू. सोशल मीडियावर काही -काही आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याबद्दल फार माहिती नाही, असंही बडगुजर यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. 

बडगुजर यांच्याबाबत बावनकुळेंचं मोठं विधान

शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठं विधान केलं. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार की दुसर्‍या पक्षात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध

सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे. सीमा हिरे यांनी म्हटलंय की, बडगुजर भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, आमच्यात यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा विचारणा झालेली नाही. मी स्वतः बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली असून, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. तसेच त्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती, तर नारायण राणे यांच्यावर त्यांनी अटक होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे अशा व्यक्तीस पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. बडगुजर यांच्यावर सध्या १७ गुन्हे दाखल असून, त्यांचे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुलावरही एका गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकरणांमधून स्वतःची सुटका व्हावी यासाठीच बडगुजर भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावेत, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 'खापरी परिसरात सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ दाखल,पोलिसांचा चोख बंदोबस्त
Zero Hour : 'आंदोलन थांबणार नाही, वाटल्यास तुरुंग भरली तरी चालतील', Bachchu Kadu यांचा इशारा
Farmers' Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाम, Bachchu Kadu यांचा सरकारला थेट इशारा
Phaltan Case: डॉक्टरने जीवन संपवलं की हत्या?', अंधारेंची Rupali Chakankar यांच्या राजीनाम्याची मागणी
Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंचा महाएल्गार, आंदोलनावर ठाम, सरकारसमोर पेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत VVPAT वापराची कायद्यांत तरतूद नाही; आयोगाने स्पष्टच सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
मुंबईतील हिवाळ्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त बैठक
मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावर उच्चस्तरीय आढावा बैठक
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूला व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
Embed widget