एक्स्प्लोर
मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या वणीमधील सप्तशृंगी गडावर मुसळधार पावसामळं दरड कोसळली. मात्र सुदैवानं मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्यानं मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले.
मंदिराच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड डोंगरमाथ्यावरून कोसळले. दरड कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली होती.
पण सुदैवानं येथे कोणतीही गंभीर घटना घडली नाही. दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यातून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement