एक्स्प्लोर
डास मारण्याचं औषध प्यायल्यानं चिमुरड्याचा मृत्यू
नाशिक: डास मारण्याचं विषारी औषध चुकून प्यायल्यानं 14 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
रविवारी संध्याकाळी कुलकर्णी कुटुंब नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी घरातल्यांचं लक्ष नसताना 14 महिन्याच्या शौर्यनं खेळता खेळता डासांना मारण्याचं मार्टिन रिफील लिक्विड नावाचं औषध चुकून प्यायला. याप्रकारानंतर शौर्यच्या वडिलांनी त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केलं मात्र दोन दिवस शौर्यची प्रकृती गंभीर होती.
दरम्यान, आज पहाटे शौर्यचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. किंवा कुठलंही किटकनाशक हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवू नका.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement