एक्स्प्लोर

नाशिक प्रेसमध्ये 15 दिवसात 500 रुपयांच्या 8 कोटी नोटांची छपाई

काही काळापूर्वी देशाच्या अनेक भागात उद्भवलेल्या क्रॅश-क्रंचची परिस्थिती पाहून हा बदल करण्यात आला आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसने मागील 15 दिवसात नोटांची छपाई 40 टक्क्यांनी वाढवून 500 रुपयांच्या सुमारे 8 कोटी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोपवल्या आहेत. करन्सी नोट प्रेस दरदिवशी एक कोटी नोटांच्या जागी 1.4 कोटी नोटा छापत आहे. काही काळापूर्वी देशाच्या अनेक भागात उद्भवलेल्या क्रॅश-क्रंचची परिस्थिती पाहून हा बदल करण्यात आला आहे. सीएनपी सूत्रांच्या माहितीनुसार, "प्रेस सध्या दरदिवशी 500 च्या 80 लाख आणि 50 रुपयांच्या 60 लाख नोटा छापत आहे. इतकंच नाही तर सरकारी सुट्टी आणि रविवारीही काम सुरु आहे. 1 मे (महाराष्ट्र दिन) रोजीही इथे छपाईचं काम सुरु होतं. 1 एप्रिलपासून छपाई प्रतिदिन 1.8 कोटी नोटांवरुन घसरुन प्रतिदिन 1 कोटी नोटांवर पोहोचली होती. पण प्रशासनाच्या निर्देशानंतर छपाई वाढवून 1.4 कोटी नोटा प्रतिदिनपर्यंत पोहोचल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यातच 1.8 कोटींपासून 2 कोटी नोटा दररोज छापण्याची योजना आहे." आरबीआयाच्या निर्देशाची प्रतीक्षा आरबीआयने नोव्हेंबर 2017 पासून एप्रिल 2018 पर्यंत प्रेसला नवा कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे इथे 500 रुपयांच्या नोटांची छपाई केली जात नव्हती. आरबीआयकडून नव्या डिझाईनच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेसने एप्रिलपासून 100 आणि 20 रुपयांच्या नोटाही छापलेल्या नाहीत. 200 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा आदेश मध्य प्रदेशच्या प्रेसला दिल्याने नाशिकमध्ये ह्या नोटांचीही छपाई बंद होती. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिलच्या मध्यापर्यंत 500 च्या नव्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली. या नोटा बाजारात येण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागला. आता दरदिवशी 500 रुपयांच्या 80 लाख नोटां छापल्या जात आहेत. काही दिवसांतच दरदिवशी 1.2 कोटी नोटा छापण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या नाशिकमधील प्रेसमध्ये 50 आणि 500 रुपयांच्या नोटांचीच छपाई सुरु आहे. कॅश-क्रंचमुळे नागरिक अडचणीत काही दिवसांपूर्वी देशाच्या विविध राज्यांमध्ये एटीएममधून पैसे येत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक शहरांमधल्या एटीएममधून रोकड संपली होती. लोग फायनान्शिअल रिझॉल्यूशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिलच्या बेल-इन क्लॉजअंतर्गत पैसे बुडण्याच्या भीतीने अनेकांनी आपल्या अकाऊंटमधून रोकड काढली. हे कॅश-क्रंचचं मोठं कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. काही जाणकारांनी श्रीमंतांवर कॅश होर्डिंगाचाही संशय व्यक्त केला. तर काही भागात नोटांच्या मागणीत फारच वाढ झाली, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं होतं. देशात गरजेपेक्षा जास्त नोटा चलनात असून बँकांमध्येही आवश्यक नोटा उपलब्ध आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget