एक्स्प्लोर
Advertisement
लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याने पार केला आठ हजारांचा टप्पा!
शेतकऱ्यांकडील शिल्लक जुना कांदा बऱ्यापैकी कमी होत आहे. तर अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं. त्यामुळे नवीन कांदा अल्प प्रमाणात बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे साहजिकच कांद्याच्या दरात रोज चढ-उतार होत आहेत.
मनमाड : कांद्याची देशासह परदेशात वाढती मागणी, यामुळे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांदा भाव खाऊ लागला आहे. नवीन लाल कांद्याने आज लासलगाव बाजार समितीत प्रति क्विंटल आठ हजारांचा टप्पा पार केला आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याचं अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर काही ठिकाणी अवकाळीचा फटका कमी बसला, त्यामुळे सध्या नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र देशातंर्गत आणि परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात वाढ होत असल्याच पाहायला मिळत आहे.
लासलगाव बाजार समितीत आज सकाळच्या सत्रात नवीन कांद्याला 8152 रुपयांचा सर्वोच्च तर सरासरी 7100 रुपये दर मिळाला. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कमी अधिक फरकाने पाहायला मिळत आहे. कळवण बाजार समितीत तर जुना गावठी कांदा अकरा हजारांवर जाऊन पोहोचला आहे. अनेक वर्षानंतर हा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे खुल्यात बाजारात कांद्याचे दर शंभरी पार करुन गेल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आहे.
शेतकऱ्यांकडील शिल्लक जुना कांदा बऱ्यापैकी कमी होत आहे. तर अवकाळी पावसामुळे नवीन कांद्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं. त्यामुळे नवीन कांदा अल्प प्रमाणात बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे साहजिकच कांद्याच्या दरात रोज चढ-उतार होत आहेत.
लासलगाव बाजार समितीत इजिप्त कांदा दाखल
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे कांद्याचे नुकसान झालं. त्यामुळे शिल्लक असलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना, केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगाव बाजार समितीत एका व्यापाऱ्याने इजिप्तचा शिल्लक असलेला कांदा विक्रीला आणला आहे. कांद्याचे दर शहरी भागात वाढल्यानंतर सरकारने बाहेरील देशाततून कांदा आयातीचा निर्णय घेतल्यानंतर इजिप्तमधून काही व्यापाऱ्यांनी कांदा आयात केला. शिल्लक कांद्यापैकी तीस क्विंटल कांदा काल लासलगाव बाजार समितीत विक्रीला आला असता स्थानिक व्यापाऱ्यांनी तो खरेदी केला आणि त्याला चांगला भाव मिळाला. भारतीय कांद्यासारख्या दिसणारा हा कांदा थोडा काळपट आणि लासलसर असला तरी त्याची चव महाराष्टातील कांद्यासारखी नसली, तरी कांद्याचे चढते भाव पाहता लासलगावच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement