एक्स्प्लोर
नाशिक महापालिकाकी हिंदी जाहिरातमें चुकाही चुका
नाशिक महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी हिंदी जाहिरातीत मराठी शब्द टाकून अज्ञानाचं जाहीर प्रदर्शन केलं आहे.

नाशिक : नाशिक महापालिकाकी हिंदी जाहिरातमें चुकाही चुका आढळी है. म्हणजेच नाशिक महापालिकाने हिंदी जाहिरातीत असंख्य चुका करुन ठेवल्या आहेत. पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी हिंदी भाषेत जाहिरात दिली, मात्र या जाहिरातीतून पालिकेने स्वतःचं हसू करवून घेतलं आहे. सहा-साडेसहा ओळींच्या जाहिरातीत व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत. हिंदी जाहिरातीत मराठी शब्द टाकून हिंदी भाषेच्या तोडक्या-मोडक्या ज्ञानाचं जाहीर प्रदर्शन केलं आहे. हिंदी भाषेत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुदतवाढ, कागदपत्रे, मसुदा यासारखे अनके मराठी शब्द वापरले आहेत. परिभाषिक शब्द कसे असावेत, याची सूची केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाच्या माध्यमातून दिलेली असताना महापालिकेने गंभीर चुका केल्या आहेत. यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. जाहिरातीतील शब्द - अपेक्षित शब्द मुदतवाढ - समय सीमा में वृद्धी जादा - ज्यादा कागदपत्रे - प्रलेख, दस्तावेज जाहीर सूचना - सार्वजनिक सूचना मसुदा - मसौंदा ये - यह पे - पर नमूद - उल्लेखित अर्जदार - प्रार्थी, आवेदक
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























