एक्स्प्लोर
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, मृतदेह पाच दिवसांपासून घरात

नाशिक : नाशकात अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीने हत्येनंतर पाच दिवस मृतदेह घरीच दडवून ठेवला होता, मात्र दुर्गंधी सुटल्यामुळे त्याचं बिंग फुटलं. विजय गव्हाणेचे स्वाती पाटील या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. पाच दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातूनच विजय गव्हाणेनं स्वातीची गळा आवळून हत्या केली. नाशिकरोड परिसरात ही घटना घडली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्यामुळे त्यानं मृतदेह घरातच लपवून ठेवला. सोमवारी संध्याकाळी सोसायटीमधील रहिवाशांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी विचारणा केली. यावेळी आरोपी विजय गव्हाणेचं बिंग फुटलं. पोलिसांनी आरोपी विजयवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















