एक्स्प्लोर

नाशकात घोटीतील दहा प्रसिद्ध डॉक्टर निघाले बोगस!

गुरुकृपा हॉस्पिटलमधील 10 डॉक्टरांकडे वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करत असल्याची तक्रार शासनाकड़ून देण्यात आली.

नाशिक : डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि बोगस डॉक्टर हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. नाशिकमध्ये वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करणाऱ्या घोटीमधील 1-2 नाही तर 10 बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी भोर.. घोटी गावात राहणारी 35 वर्षीय महिला 20 जानेवारीला सिझरसाठी घोटीच्या भंडारदारा रोडवर असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच सकाळी तिला रक्तस्त्राव झाला. वेदना असह्य झाल्या, सोबत असलेल्या तिच्या मावशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शोधत होत्या, मात्र कोणत्याही डॉक्टरने याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी काही वेळातच अश्विनीचं बाळ दगावलं. अश्विनीच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना काही तासातच याच हॉस्पिटलमध्ये पोटदुखीवर उपचार घेणाऱ्या कविता दुभाषे या 12 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर संतप्त जमावाने या हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोगस असल्याचा आरोप करत 250 ते 300 गावकरी आणि मृतांच्या नातेवाईकांनी घोटी पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. या प्रकरणाचा पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपास सुरु असतानाच इगतपुरी तालुक्याचे आरोग्य अधिकारी संजय पवार यांनी घोटी पोलिस ठाण्यात तक्रार केली. गुरुकृपा हॉस्पिटलमधील 10 डॉक्टरांकडे वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करत असल्याची तक्रार शासनाकड़ून देण्यात आली. पोलिसांनी नरेंद्र ब्रम्हेचा, नरेंद्र सिंग, भगवान दुर्गुडे, नईम शेख, राहुल पाटील, कैलास गायकर, प्रदीप बागल, ब्रदर विकी जाधव, विजय पाटील आणि जितेंद्र चोरडिया या स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या आणि घोटीमध्ये मोठं नाव असलेल्या 10 डॉक्टरांवर फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33, 34 आणि 39 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचं समजताच दहाही डॉक्टर फरार झाले असून पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि बोगस डॉक्टर हा विषय काही दिवसांपासून चांगला चर्चेत असतानाच अशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांवर आता कठोर शासन होण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget