एक्स्प्लोर
शिवसेनेच्या विजयाला भुजबळांची मदत: नरेंद्र दराडे
तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवाय पंकज भुजबळही ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते.
नाशिक: नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे.
खरं तर भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी 200 मतांनी विजय मिळवला.
विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल
तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवाय पंकज भुजबळही ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. महत्वाचं म्हणजे शिवसेनेशी जुने ऋणानुंबध आहे, असं विधान त्यावेळी भुजबळांनी केलं होतं.
याशिवाय नुकतंच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
या सर्व बाबीवरुन भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळांनी शिवसेनेला मदत केली हा शिवसेनेचा दावा फेटाळला आहे.
“भुजबळांनी मदत केली असं तुम्ही म्हणता, मात्र आम्हाला तसं वाटत नाही. नाशिकमध्ये भाजपने शिवसेनेलाच मतदान केलं”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून काम केलं’
तिकडे परभणीतील काँग्रेसच्या पराभवावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं.
“परभणीमध्ये मी आणि अशोक चव्हाण उमेदवारांच्या सतत संपर्कात होतो. आम्ही मिळून प्रयत्न केले”, असं जयंत पाटील म्हणाले.
परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.
‘नरेंद्र पाटील पक्ष सोडणार नाहीत’
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, नरेंद्र पाटील पक्ष सोडून जातील असं वाटत नाही, माथाडी कर्मचारी पवार साहेबांच्या मागे आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
लातूर-बीड-उस्मानाबाद जिंकू शकतो
लातूर- बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाने राखून ठेवला आहे. मात्र या जाही आम्हाला विजय प्राप्त होऊ शकतो, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
आमच्या आघाडीमध्ये बिघडी नाही. पुढच्या निवडणुकीतही आघाडी होईल, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीला पुन्हा धक्का, आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?
LIVE विधानपरिषद निकाल: शिवसेना 2, भाजप 2, काँग्रेसला धक्का
विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement