एक्स्प्लोर
Advertisement
डोकं लावून कोबी पिकवला, भाव न मिळाल्याने 7 एकरवर नांगर फिरवला
कोबीला भाव न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद सोनवणे यांनी सात एकर शेतीवर नांगर फिरवला.
मनमाड (नाशिक): शेतमाल आणि भाजीपाल्याला भाव नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. कोबीला भाव न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील सटाण्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद सोनवणे यांनी सात एकर शेतीवर नांगर फिरवला.
अरविंद सोनवणे यांची सटाणा शहरालगत शेती आहे. त्यांनी साडेसात एकरात कोबीची लागवड केली. बऱ्यापैकी पाणी मिळाल्याने कोबीची 1 लाख 65 हजार रुपयाची रोपं विकत घेतली. खतं, औषधं, फवारणी, मजुरी असा सर्व मिळून जवळपास दोन लाख 85 हजार रुपये खर्च आला. नीटनेटके व्यवस्थापन करुन दर्जेदार उत्पादन घेतले. माल काढणीला आला आणि पहिल्याच तोड्यात 100 किलो माल त्यांनी बाजारत विक्रीला पाठविला.
पण त्याला अवघा 2 ते 3 रुपये किलो असा भाव मिळाला. ज्या गाडीतून माल भरुन पाठविला त्या गाडीच्या भाड्याचे पैसेही वसूल झाले नाहीत. उलट त्यात खिशातून पैसे भरावे लागले.
या सर्व परिस्थितीमुळे वैतागलेल्या अरविंद सोनवणे यांनी संपूर्ण साडेसात एकरावर ट्रॅक्टरने रोटोवेटर फिरवत, कोबीचं पीक उद्ध्वस्त केले.
आधी कांद्याला भाव नाही, मागणी घटल्याने कांदा आज सात ते आठ रुपये किलोने विकला जात आहे. त्यात भर पडली ती टोमॅटोची. टोमॅटोला 1 ते 2 रुपये किलोचा भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी हा टोमॅटो रस्त्यावर किंवा गुरांना खाऊ घातला.
त्यानंतर आता कोबीलाही तुटपुंजा असा 2 ते 3 रुपयांचा दर मिळत आहे. तर शिमला मिरची 10 रुपये किलोने विकावी लागत आहे. सगळ्याच भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
Advertisement