एक्स्प्लोर
नाशिकमधील कोट्यवधीच्या भुजबळ फार्मवर एसीबीची धडक
नाशिक: नाशकातील छगन भुजबळांची शान असलेलं भुजबळ फार्मवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जप्तीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एसीबीचं पथक भुजबळ फार्मवर दाखल झालं असून मोजमाप आणि व्हॉल्युएशनचं काम सुरु आहे. मात्र ही जप्तीची कारवाई नसल्याचं भुजबळ कुटुंबीयांच्या वतीनं सांगण्यात येतं आहे.
नाशिकमधील गोविंदनगर भागातील भुजबळ फार्मवर ईडीचं पथक दाखल झालं असून त्यांच्याकडून फार्मचं मोजमाप सुरु आहे. नाशिकमधील भुजबळ फार्म हे बेहिशेबी पैशांतून बांधलं असल्याचा ईडीचा आरोप आहे. त्यामुळे आता भुजबळ फार्मवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीनं भुजबळांच्या २२ मालमत्तांवर टाच आणली आहे. यामध्ये मुंबईसह नाशकातील अनेक प्रॉपर्टींचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम खातं असताना ठेकेदारांकडून जवळपास 780 कोटींचा लाभ घेत या पैशातून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप भुजबळांवर आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement