एक्स्प्लोर

नाशिकमधील कथित घोटाळ्याबाबत काँग्रेस नगरसेविकेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

थेट नरेंद्र मोदींकडे स्मार्ट सिटी आणि सफाई कर्मचारी ठेक्यातील गैरव्यवहाराविषयी धाव घेतल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरला असून भाजपची यामुळे मोठी कोंडी झाली आहे.

नाशिक : नाशिकमधील एका कथित घोटाळ्याबाबत काँग्रेसच्या नगरसेविकेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये चांगलाच चर्चेत असतांना आणि हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच काँग्रेसच्या नगरसेविका तथा प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करत तक्रार केलीय. या तक्रारीत हेमलता पाटील यांनी म्हटलं की "तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला होता. मात्र नाशिकमध्ये याच सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा यात हात आहे. महापालिकेत ठेकेदारामार्फत 700 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना 27 हजार प्रतिमाह देणे अपेक्षित असतानाच त्यांच्या बँक खात्यातून ठेकेदार 16 हजार रुपये कपात करून कर्मचाऱ्यांना 11 हजार 500 रुपये एवढेच वेतन देत असून अशाप्रकारे दरमहा एक कोटी 85 लाख रुपयांचा गैरव्यवहार होतो आहे. तुम्हाला भ्रष्टाराचाची खूप चिड आहे, मात्र येथे सरळ सरळ अशाप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातय." हेमलता पाटील यांनी यापूर्वी स्मार्ट सिटीतील अनागोंदी कारभाराविषयी मुख्यमंत्रयांकडे तक्रार केली होती. मात्र आता त्यांनी थेट मोदींकडे स्मार्ट सिटी आणि सफाई कर्मचारी ठेक्यातील गैरव्यवहाराविषयी धाव घेतल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरला असून भाजपची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या आरोपांबाबत महापौरांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केलीय. एकंदरीतच हेमलता पाटील यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची पंतप्रधान कार्यालयाकडून आता कशाप्रकारे दखल घेतली जातीय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget