एक्स्प्लोर
भाजप नगरसेवकांची कार तोडफोड, पक्षातीलच पदाधिकारी अटकेत
भाजप पदाधिकारी आणि विद्यमान नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनिल खोडे यांना अटक करण्यात आली.
नाशिक : नाशकातील भाजप नगरसेवकांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुनिल खोडे यांना नाशिकमधील इंदिरानगर पोलिसांनी अटक केली.
भाजप पदाधिकारी आणि विद्यमान नगरसेविका सुप्रिया खोडे यांचे पती सुनिल खोडे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
भाजप नगरसेवक सतीश सोनवणे आणि नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. पाच एप्रिलच्या मध्यरात्री झालेल्या तोडफोड प्रकरणी आठवड्याभरानंतर अटक झाली.
विकासकामांच्या श्रेयवादावरुन हा सर्व प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून भाजपची अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे पक्ष सुनील खोडेवर काय कारवाई करणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement