एक्स्प्लोर
भाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात
भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला कसाराजवळ अपघात झाला. सुदैवाने सीमा हिरे या सुखरुप आहेत. मात्र, अपघातानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकानं तिथे बराच गोंधळ घातला.

नाशिक : भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला कसाराजवळ अपघात झाला. सुदैवाने सीमा हिरे या सुखरुप आहेत. मात्र, अपघातानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकानं तिथे बराच गोंधळ घातला. कसाराजवळ सीमा हिरे यांच्या गाडीला मागून येणाऱ्या कारने धडक दिली. त्यानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकानं समोरील वाहनचालकाला शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी सुरक्षा रक्षकानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आमदार हिरे यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी आमदार सीमा हिरे या नाशिकवरुन मुंबईला येत असताना हा प्रकार घडला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी सुरक्षा रक्षकानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आमदार हिरे यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी आमदार सीमा हिरे या नाशिकवरुन मुंबईला येत असताना हा प्रकार घडला. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
बीड























