एक्स्प्लोर
राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात

नाशिक : नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच काँग्रेसचं नुकसान झालं आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवाय, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेऊ, असेही अशोक चव्हाण म्हणाले. “भाजप सरकारला डोकं नाही. हेल्मेट, कांदा असो किंवा डाळीचा मुद्दा, एकाही विषयावर काय निर्णय घ्यावा, हेच भाजप सरकारच्या मंत्र्यांना कळेना, अशी अवस्था आहे” अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. आडतीच्या निर्णयावरुन अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. आडत बंदीच्या निर्णयाआधी कांद्याला पर्यायी व्यवस्था द्यायला हवी होती, असे अशोक चव्हाण म्हणाले. मोदी सरकारवर निशाणा साधताना अशोक चव्हाण म्हणाले, “न खाऊंगा न खाने दूँगा, ही मोदींची घोषणा फक्त डाळींच्या बाबतीत खरी ठरली. मोदी सरकारच्या काळातही महागाई, शेतकरी आत्महत्या, पीक विमा सर्व प्रश्न जैसे थेच आहेत.”
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
अहिल्यानगर
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















