Lok Sabha Election Result 2024 : नाशिक (Nashik Lok Sabha) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा (Dindori Lok Sabha Constituency) उद्या निकाल जाहीर होणार आहे. निकालाच्या दरम्यान नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून चोख नियोजन केले जात आहे. तर सोशल मीडियावर देखील नाशिक पोलिसांची नजर असणार आहे. 


नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजेपासून मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना येणारे मार्ग हे स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त परिसरामध्ये तैनात असणार आहे. तसेच सोशल मिडियावरदेखील नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) लक्ष ठेवण्यात येत आहे .


नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा


आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नाशिक शहर पोलीस संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट काय होत आहे यावर देखील पोलीस ऑनलाइन सेलकडून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. 


मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल


जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनी एम.आय.डी. सी. अंबड ते अंबड वेअर हाऊस ते पावर हाऊस अंबडकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ग्लॅक्सो कंपनी मेन गेट अंबड लिंक रोड, ते संजीवनी बोटनिकल नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहतुकीस प्रवेश बंद. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.


असे आहेत पर्यायी मार्ग


जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनी ते उज्ज्वल हुंडाई नाशिक ते गरवारे या मार्गाने वाहतूक सुरू राहील. गरवारे ते पावर हाऊस मार्गे एक्स्लो पॉइंट या मार्गाने वाहतूक सुरू राहील. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहने ही अजिंठा हॉटेल मार्गे एक्स्लो पॉइंटकडून वळण घेऊन जातील.


इतर महत्वाच्या बातम्या 


'सिन्नरमधून एक लाखाचा लीड, मी निवडून येणारच', निकालाआधीच राजाभाऊ वाजेंना विजयाचा ठाम विश्वास!


Nilesh Lanke : अपराजित संघर्ष योद्धा! निकालाआधीच नाशकात झळकले निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्स