नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उद्या (दि. 04) मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. शनिवारी (दि. 01) विविध माध्यमांशी एक्झिट पोल समोर आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे (Mahayuti) उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पिछाडीवर आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात हा अंदाज असून नाशिकमधून गोडसे की वाजे, नक्की कोण बाजी मारणार? याचे चित्र येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. मात्र निकालाच्या काही तासाआधीच राजाभाऊ यांनी मोठा दावा केला आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) उमेदवारांच्या पहिल्याच यादीत राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला होता. राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या तळागाळात जाऊन आपला प्रचार केला आहे.   


सिन्नरमधून एक लाखाचा लीड मिळणार : राजाभाऊ वाजे 


राजाभाऊ वाजे म्हणाले की, मतदानापासून ते मतमोजणीच्या दिवसांमध्ये कार्यकर्त्यांची आणि पक्षातील नेत्यांची भेट घेत निवडणुकीचा अहवाल घेतला. आकडेमोड करणार नाही. मात्र विजयाची खात्री आहे. उद्याचा निकाल हा माझ्या बाजूने लागेल, असा विश्वास राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले आहेत. उद्याच्या निकालात सिन्नरमधून जवळपास एक लाखाचा लीड मला मिळेल आणि शहरी भागात देखील मला बऱ्यापैकी मतदान होईल. त्यामुळे उद्या येणारा निकाल हा माझ्या बाजूने असणार असल्याचं राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे.


उद्या यश मिळणार हे नक्की : राजाभाऊ वाजे


लोकांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली आहे. त्या मेहनतीला नक्की यश येईल. निवडणुकीत प्रतिसाद मोठा होता आणि चांगला अनुभवही मिळाला आहे. मी आकडेमोड करणार नाही पण, उद्या यश मिळणार हे नक्की असल्याचा विश्वास राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिक, दिंडोरी लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात, वाहतूक मार्गात मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर


Nilesh Lanke : अपराजित संघर्ष योद्धा! निकालाआधीच नाशकात झळकले निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्स