Nilesh Lanke नाशिक : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) शनिवारी प्रसिद्ध झालेत. यात देशात मोदी सरकार पुन्हा एकदा विराजमान होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएला 350 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात महायुतीला फटका बसण्याची चिन्ह आहेत. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) हे आघाडीवर आहेत, तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) हे पिछाडीवर आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये कोण गुलाल उधळणार? याचे चित्र 4 जून रोजी स्पष्ट होणार असले तरी नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्स झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश यांच्या यांच्यासाठी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. अहमदनगरच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा 


आता निकालाआधीच नाशिकमध्ये निलेश लंकेच्या विजयाचे बॅनर झळकले आहे. अहमदनगर मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाशिकमध्ये बॅनर झळकल्याने चर्चांना उधाण आले आहे. सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा, उत्तमनगर, पवननगर यांच्यासह विविध भागात बॅनर लागले आहेत. निलेश लंके यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करत निलेश लंकेंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  बॅनर्सवर 'अपराजित संघर्ष योद्धा' जनता जनार्दन माझ्या पाठीशी, अशा प्रकारचा मजकूर छापण्यात आला आहे. हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या बॅनर्सची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


'मला 100 टक्के विश्वास, दोन लाखांच्या फरकाने जिंकणार', निलेश लंकेंनी स्वत:चा एक्झिट पोल सांगितला!


North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?