DG Mahesh Bhagwat : यशाला शॉर्टकट नसतो, तुम्ही 21 व्या वर्षी सुद्धा आयएएस होऊ शकता? अतिरिक्त डीजी महेश भागवत यांनी दिल्या टिप्स
DG Mahesh Bhagwat : नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्डन टिप्स दिल्या.
DG Mahesh Bhagwat : पदवीच्या शिक्षण घेत असताना यूपीएससीचा (UPSC) अभ्यासक्रम समोर ठेवून तयारी करता येते. वयाच्या 21 व्या वर्षी तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण होते. याच वयाच्या 21 व्या वर्षी तुम्ही परीक्षेला बसलात, आणि तुमची तयारी चांगली असेल तर वयाच्या 22 व्या वर्षी तुमची निवड होऊ शकते, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र यशाला शॉर्टकट नसतो असे सांगत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तासाभरात यशाच्या गोल्डन टिप्स अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत (Mahesh Bhagwat) यांनी दिल्या.
गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात शतकोत्तर महोत्त्सवी वर्षानिमित्त वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी प्रमुख म्हणून कार्यरत महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांशी वसंत व्याख्यानमालेतून (Vasant Vyakhyanmala) संवाद साधला. ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये व्यासपीठावरून बोलत होते. स्पर्धा परीक्षा म्हणजे संघर्षाचा काळ असतो, तो प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येतच असतो. त्या संघर्षाच्या काळावर मात करून पुढे जायचे असते. त्यामध्ये काही शॉर्टकट नसतो, या काळात जे मार्गदर्शक भेटतात, ते शेवटपर्यंत सोबत असतात. त्यामुळे यश गवसल्यानंतर एक भावना निर्माण झाली, आपल्याला समजाला काहीतरी देणं आहे, ज्या पद्धतीने आपण समाजाकडून काहीतरी घेत असतो, तसेच आपल्याला काहीतरी द्यावं लागत, याच भावनेतून 2014 पासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना यात विशेष म्हणजे यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरविले.
पदवीला असताना स्पर्धा परीक्षांची तयारी करा....
यूपीएससीचा विचार केला तर महाराष्ट्रातसह देशभरातील अनेक राज्यातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा देत असतात. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा निकाल हा कमी लागलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील युवक कसे बघतो याकडे? यावर ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन बघितला तर सुरुवातीपासून त्यांचा यूपीएससी देण्याकडे कल असतो. आणि त्याच पार्श्वभूमीवर ते अभ्यास करत असतात. महाराष्ट्रमध्ये पदवी झाल्यानंतर यूपीएससी, एमपीएससीचा विचार केला जातो. एक पर्याय म्हणून आपण यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करत असतो. मात्र सद्यस्थितीत चित्र बदलताना दिसते आहे. पाल्यांना प्रेरित करून त्यांना कला, वाणिज्य या शाखांना प्रवेश घेत आहेत. त्याचबरोबर यूपीएससी एमपीएससीचा पदवीच्या शिक्षणादरम्यानच अभ्यास किंवा तयारी करावी, असा हट्ट ही पालक धरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठी टक्का हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा निकालाचा टक्का कमी असल्याची परिस्थिती सध्या नाही. दरम्यान आयएएसच्या परीक्षेत महाराष्ट्रातून 12 टक्के विद्यार्थी असतात नाही. पहिल्या नंबरवर म्हणावा तसा आकडा नाही, पण एकूण निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी टक्का वाढेल, यात शंका नाही.
वयाच्या 21 व्या वर्षीही आयएएस होऊ शकता?
स्पर्धा परीक्षा संदर्भात वयाची अट खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे कोणत्या वयापर्यंत परीक्षा द्यावी किंवा या परीक्षांना देण्याची सुरुवात कधी करावी, यावर ते म्हणाले की, ज्यांना स्पर्धा परीक्षांविषयी थोडीफार माहिती आहे. त्यांनी पदवीच्या शिक्षणा दरम्यान यूपीएससीचा अभ्यासक्रम समोर ठेवून जो ऐच्छिक विषय आहे तो निवडून त्याच काळात जर तयारी केली. त्याचवेळी आपण पदवीच शिक्षण देखील पूर्ण करत असतो. त्यावेळी या परीक्षेला तुम्ही परीक्षा देऊ शकतात. ज्या वर्षी तुम्ही परीक्षा देतात. त्यावर्षी तुमचं पदवीचे शिक्षण पूर्ण झालेलं असावं, अशी अट असते. या दोन गोष्टींमध्ये तुम्ही बसत असाल, वयाच्या 21व्या वर्षी तुम्ही परीक्षेला बसलात, तुमची तयारी चांगली असेल तर वयाच्या 22 व्या वर्षी तुमची निवड होऊ शकते, अशी अनेक उदाहरणं आहेत.
उच्चपदापर्यंत जाण्याची शक्यता...
जेवढ्या लवकर तुम्ही सिलेक्ट व्हाल, एवढ्या लवकर तुम्ही उच्च पदापर्यंत जाण्याची शक्यता असते. राज्याचा महासंचालक असेल, राज्याचे मुख्य सचिव असतील, देशाचे कॅबिनेट पद असेल, या पदापर्यंत फार कमी वयात निवड झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे जेवढ्या कमी वयात तुम्ही स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण व्हाल, तेवढ्या लवकर तुम्ही उच्च पदापर्यंत जाण्याची शक्यता असते. वयाची 32 वर्ष, दहा प्रयत्न, खुल्या गटासाठी ही मर्यादा असते. वयाची 32 वर्ष, 9 प्रयत्न हे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असते. वयाची 37 वर्ष आणि अटेम्प्टची मर्यादा नाही, ही अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्याना अट असते. म्हणजे जवळजवळ 16 वेळा परीक्षा द्यायची असते. मग एवढ्या वेळी परीक्षा द्यायची का? घरची परिस्थिती बघून तसा विचार करणे महत्वाचे असते. त्यामुळे एखादा प्लॅन बी हातात ठेवणे महत्वाचे आहे. तो प्लॅन महत्वाचा वाटतो, आपली क्षमता, विकनेस लक्षात घेऊन या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे.