एक्स्प्लोर

सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू, नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील दुर्दैवी घटना

Nashik News update : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्या बहिणींचा तलावात बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

Nashik News update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भुमिका नरेश राऊत आणि उज्वला नरेश राऊत अशी या मुलींची नावे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाऊबीजेच्या दिवशी नाशिकहून कोपरगावी माहेरी गेलेल्या विवाहितेचा आणि तिच्या भाचीच्या तलावात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज सुरगाणा तालुक्यातील राशा गावी शोककळा पसरली आहे. कपडे धुवायला गावापासून काही अंतर असलेल्या तळ्यावर गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे.

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्या बहिणींचा तलावात बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील उंबरठाण जवळील राशा येथील इयत्ता चौथीत शिकणारी भुमिका नरेश राऊत आणि इयत्ता दुसरीत शिकणारी उज्वला नरेश राऊत  या सख्या दोघी बहिणी अकरा वाजण्याच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळ्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना थोरली बहिण भुमिका हिचा पाय घसरल्याने ती बुडाली. यावेळी तिला वाचवण्यासाठी उज्वला हिने पाण्यात उडी मारली. दोघींना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही बुडू लागल्या. मोठ्या बहिणीला वाचविण्याचा नादात दोघींची घट्ट मिठी पडल्याने दोघींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  

महत्वाच्या बातम्या

Nashik Crime :  नाशिकच्या विद्यार्थ्यांची फसवणूक, वैद्यकीय चाचणी झाली, नियुक्तीपत्रही आले, मात्र अशी भरतीच नाही!  

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget