Sanjay Raut : 'त्या' शेतकऱ्यांचे 178 कोटी गेले कुठे? जामिनीसाठी न्यायालयात निघालेल्या राऊतांचा भुसेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होणार आहे.
Sanjay Raut News : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सत्तेचा गैरवापर करत असून, भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर आज सुनावणी आहे. या सुनावणी आधी राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच गिरणा सहकारी साखर कारखान्यासाठी जमा केलेले 178 कोटी कुठे गेले असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणी दादा भुसे यांनी राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणी जामिनासाठी संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर होणार आहे. दरम्यान यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सर्व मंत्री भ्रष्ट आहेत
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, "दादा भुसे सत्तेचा गैरवापर करत आहे. दादा भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. या सरकारचा पाया आणि कळस भ्रष्ट आहे. खोके मोजून हे सरकार आलं आहे. याबाबत कागदपत्र असून, लवकरच समोर आणेल. न्यायालयाचा आदर करावाच लागतो, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
सत्तेचा गैरवारपर सुरु आहे
दरम्यान, पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की. "प्रश्न विचारला तर अब्रू कशी काय गेली. शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत, लोक रस्त्यावर उतरले आहेत, म्हणून तुम्ही त्या हजारो लोकांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. हातामध्ये सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवारपर सुरु आहे. मालेगावात आम्ही जाऊ कोर्टात भूमिका मांडू, असं राऊत यांनी सांगितलं आहे.
आम्ही फक्त हिशोब मागितल
'मालेगावमधील आमदार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे आम्ही फक्त हिशोब मागितला. गिरणा मोसम सहकारी कारखाना वाचवण्यासाठी आपण 178 कोटी शेतकऱ्यांकडून रुपये गोळा केले. त्या पैशाचा हिशोब तुम्ही द्यायला हवा. ते पैसे कुठे गेले, त्या पैशाचं काय झालं. ते पैसे मनीलॉड्रींग मार्गाने परदेशात गेले का, शेतकऱ्यांना विचारण्याचा अधिकार नाही किंवा शेतकऱ्यांच्या वतीने कोणत्या राजकीय पक्षाला किंवा लोकप्रतिनिधीला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का. आम्ही तेवढंच विचारलं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.'
Sanjay Raut Full PC : दादा भुसेंनी पैशांचा हिशोब द्यावा, हीच आमची मागणी : संजय राऊत
इतर महत्वाच्या बातम्या:
Dada Bhuse : चुकीचं वक्तव्य केलं तर न्यायालयात आपण दाद मागूच , दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा