Sanjay Raut : राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिक मनपा (Nashik NMC) हद्दीत  मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. दोन दिवसात मी घोटाळ्याचे पुरावे सादर करत मोठा स्फोट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 


संजय राऊत यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर एक पोस्ट शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Govenment) निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. 


नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा - संजय राऊत 


नाशिक महानगरपालिका हद्दीत ८०० कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तो पर्यंत लाभार्थींनी शांत झोपावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण आहे तरी काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राउतांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा 


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन याने  पोलीस कोठडीत आत्महत्या केली आहे. यावरून संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलीस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला. याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचं गृहमंत्रालय, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राऊतांची वृत्ती लांडग्याची, ठाकरेंवरही पहिल्यांदाच थेट प्रहार; स्वप्ना पाटकर प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे संतापल्या


Vinod Tawade : ...तर संजय राऊत भाजपमध्ये आले असते; फडणवीसांचं राजकारण सुडाचं नाही; विनोद तावडे