पुणे : तपास यंत्रणांचा दबाव असता तर संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजपात आले असते, असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (BJP Vinod Tawade) यांनी केलं आहे. त्यासोबतच मी राज्याच्या राजकारणात येणार नाही आहे सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.  पुण्यात पत्रकार संघातर्फे त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. 



'फडणवीस हे सुडाच राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते. युती म्हणून लढलो बाळासाहेबांची मते भेटली. मग, आम्हाला सोडून जाता याला गद्दारी म्हणत नाहीत. आम्ही विचारांवर युती केली होती', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आतापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल झाले आहेत. हे सगळं दबावतंत्र असल्याचं बोललं गेलं मात्र दबावतंत्र असतं तर संजय राऊत देखील भाजपात आले असते, असंही ते म्हणाले. 


‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’



मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे, असंही  त्यांनी  स्पष्ट केले. त्यासोबतच भाजपमध्ये सर्व निर्णय हे केद्रीय नेत्यांशी चर्चा करुन घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतले जातात, असंही ते म्हणाले. 


विरोधकांच्या प्रचारावर बोट 



सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक प्रकारच्या टीका टिप्पण्या होताना दिसत आहे. त्यावर बोलताना विनोद तावडेंनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणे हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही. पवारांप्रमाणेच खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराबद्दल केलेले वक्तव्य यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला मिळाले नाही. महाराष्ट्रात मात्र विरोधकांकडून ज्या पद्धतीने प्रचार केला जात आहे, ते पाहता हा काही शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार नाही,’ असं तावडे म्हणाले.


 


इतर महत्वाची बातमी-


Raj Thackeray: सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर


Rahul Gandhi on Electoral Bonds : राजकारण साफ करत होता, तर निवडणूक रोख्यातील देणगीदारांची नावं का लपवली? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल