एक्स्प्लोर

Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Pawar : रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार (Rohit Pawar) हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं. यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.   

विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात मेळावे आणि सभा घेतल्या जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा आशयाचे बॅनर झळकले आहेत. आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.   

रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर

आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहे. नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे. तर राज्यातील अनेक ठिकाणी देखील रोहित पवारांचे बॅनर्स लागले आहेत. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची पुढची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल, असे वक्तव्य शरद पवारांनी काल केले होते. यानंतर आज भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रोहित पवारांचेही नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे. 

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार? 

माझी पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंत दादांचा सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी", असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवारांच्या आगामी मंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. विशेष म्हणजे "महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल", असं वक्तव्य शरद पवारांनी केले. शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांचा देखील मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तर सांगितला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  

आणखी वाचा

Sanjay Patil : 'भाजपचे नेते सागर बंगल्याच्या आशीर्वादाने दहशत..',राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून मारल्यानंतर रोहित पवारांचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळLadki Bahin Verification : लाडकी बहीण अर्जाची पडताळणी होणार, अपात्र बहिणींचं काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Embed widget