एक्स्प्लोर

मोठी बातमी! राज ठाकरेही घेणार काळाराम मंदिराचे दर्शन; म्हणाले "अयोध्येचीही मूर्ती काळी, आपले..."

Raj Thackeray : अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे. मात्र, सगळं शांत झाल्यावर जाईल. सध्या तिथे खूप गर्दी आहे. त्यामुळे मी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

Raj Thackeray नाशिक : अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे मात्र, सगळं शांत झाले की, सध्या तिथे खूप गर्दी आहे. साधारण तीन लाख पोलीस तिथे आहेत आणि १० लक्ष भाविक रोज दर्शन घेत आहे. अयोध्येचीही मूर्ती काळी आहे. आपले काळाराम मंदिर आहेच की, त्यामुळे मी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) जाऊन दर्शन घेणार, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूकच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर आज बैठक झाली. शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होत आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत सध्या चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्ष ही चाचपणी करत आहेत आम्ही ही करतोय, असे राज ठाकरे म्हणाले. 

यांचा काही भरोसा आहे का? महाविकास आघाडीत कोण जाणार

राज ठाकरे जर मविआसोबत आले तर त्यांना मविआत घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले की, मुळात त्यांच्याकडे जातंय तरी कोण?  आताचे लवंडे कुठे जातील हे काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? महाविकास आघडीत कोण जाणार? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. 

तरीही मतदान झाले नाही

ते पुढे म्हणाले की, मागच्या मनपा निवडणूकमध्ये मी व्हिडीओ नव्हते लावले तरीही मतदान नाही झाले. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठोकताळे मांडता येत नाही. 1992 ला बाबरी , बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर होती. 2014 वेगळे कारण होते. आता राम मंदिर झाल्याचे समाधान आहे. पण, जनता भाजपला मतदान करतील असे नाही. 

मी काल इंजेक्शन दिलंय

नाशिकमध्ये मनसे नेत्यांची गटबाजी आहे अशी विचारणा केली असता राज ठाकरे म्हणाले की,आमचा कारभार उघडा आहे, त्यामुळे गटबाजी दिसून येते. निवडणूक आल्यावर इतर पक्षातील तडे दिसतील. मी काल इंजेक्शन दिले आहे. कितीमध्ये फरक पडतो ते बघू. 

आता का उपोषण करतात?

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, मी मागेच जरांगे पाटील यांची भेट घेतली. तेव्हा सांगितले होते असे होणार नाही. कोर्टात प्रकरण जाणार, कोणीतरी राजकीय दृष्टीने मोर्चे घेऊन येतात, मराठा बांधव जातात. मुख्यमंत्रीशी चर्चा केल्यानंतर विजय उत्सव साजरा केला आता का उपोषण करतात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे

टोलबाबत राज ठाकरे म्हणाले की, माझा टोलला विरोध नाही. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते.  त्यावर विरोध आहे. विषय टोल नाही टोल वसुली आहे. पैसे भरून झाले की नाही हे कधी कळेल.  मुंबई पुणेच्या हायवेवर किती पैसे वसूल होतात? मुख्यमंत्र्यांना भेटून उद्या त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी ठेवणार आहे. पैसे टोल वाल्यांच्या खिशात जात आहेत किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जाणार हे चालेल का. खड्डे जर असतील तर टोल कशासाठी? कोकणचा रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल आहे.  ट्रान्स हार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे. राज्य सरकार आणि खाजगी माणसाच्या खिशात पैसे जातात हे बघायला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal : "ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, तिथे मी सिनियर प्रोफेसर"; छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला

 

महत्त्वाच्या बातम्या

Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget