Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे राजीनामे, शरद पवार यांनी निर्णय मागे घेण्याची कार्यकर्त्यांकडून विनंती
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे राजीनामे, शरद पवार यांनी निर्णय मागे घेण्याची कार्यकर्त्यांकडून विंनती
Maharashtra Politics Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते, सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता जळगावतील (Jalgaon) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं असून शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तर राज्यातील दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे सावर आले असून राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत असल्याचे चित्र आहे.
शरद पवारांचं (Sharad Pawar) राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या (Lok Majhe Sangati) सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला आणि निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यानंतर शरद पवारयांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध जोरदार केला. निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. यावर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठकीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे.
दरम्यान जळगाव येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले कि, शरद पवार यांच्या निर्णयाचे मोठे दुःख आहे. देशात आणि राज्यात मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याबाबतचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असं भावनिक आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्ते यांच्यावतीने शरद पवार यांना आवाहन करण्यात आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलंच ढवळून निघाल आहे..
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
दरम्यान शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यभरातून राज्यकर्त्यांनी विरोध दर्शवत राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे धाराशीव जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा पदाचा राजीनामा दिला असून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष नाझेर काजी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने करण्यात येत आहेत.