एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकचे नवे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी भाजपच्या मर्जीतले की शिवसेनेच्या? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये रंगले शीतयुद्ध

Nashik News : मर्जीतील अधिकारी आणण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु असल्याने नवे महापालिका आयुक्त मिळत नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली होत नसल्याची अशी चर्चा नाशिकमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. 

Nashik News : नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांची काही दिवसांपूर्वीच साखर आयुक्त (Sugar Commissioner) म्हणून बदली झाल्याने महापालिका आयुक्त (Municipal Corporation Commissioner) पद हे सध्या रिक्त आहे. तर नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी देखील जवळपास महिनाभरापूर्वी बदलीसाठी शासनाकडे विनंती केली आहे. मात्र मर्जीतील अधिकारी आणण्यावरुन शिवसेना (Shiv Sena)  आणि भाजपमध्ये (BJP)  वाद सुरु असल्याने नवे महापालिका आयुक्त मिळत नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली होत नसल्याची अशी चर्चा नाशिकमध्ये (Nashik) दबक्या आवाजात सुरु आहे. 

नाशिकच्या आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध

आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपच्या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं शीतयुद्ध आता समोर आलं आहे.अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन-तीन दिवसांमध्ये होतील, असं नाशिकचे माजी पालकमंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी (18 जून) स्पष्ट केलं होत. "दोन-तीन दिवसांमध्ये नवे आयुक्त आणि जिल्हाधिकारी नाशिकमध्ये येतील तो निर्णय झाला आहे. एक-दोन दिवसात फाईलवर सह्या होतील आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं गिरीश महाजन म्हणाले होते.

तर विद्यमान पालकमंत्री शिवसेना नेते दादा भुसे यांनी यावरुन कुठलाही वाद नसल्याचं सांगितलं. भाजप आणि आम्ही हातात हात घालून काम करतोय. अधिकाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय भाग असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं दादा भुसे म्हणाले. 

नाशिकला नवे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त कधी मिळणार?

त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या बदल्या नक्की कोणामुळे रखडल्या ? नाशिकला नवे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नक्की कधी भेटणार ? आणि ते कोणाच्या मर्जीतील असतील ? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या 2 जून रोजी बदल्या करण्यात आल्या होत्या. 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली. त्यांच्याकडे साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहिला आहे. तर तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे. 

हेही वाचा

Maharashtra IAS Officer Transfer: राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांची महिनाभरात पुन्हा बदली; पाहा यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget