एक्स्प्लोर

नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने, मुख्यमंत्र्यांचा अजितदादांच्या उमेदवाराला फोन, काय झाली चर्चा?

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आमनेसामने असल्याने बिघाडी झाल्याचे चित्र आहे.

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) बैठकांचा धडाका सुरु आहे. तर महायुतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Camp) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा (NCP Ajit Pawar Camp) उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झालेली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चौरंगी लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

नेमकी काय झाली चर्चा? 

नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्याशी फोन वरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी महेंद्र भावसारांना केल्याचे समजते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतरही महेंद्र भावसार हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. 

जळगाव शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये सभा घेतल्या. जळगावातील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'एक्स' सोशल माध्यमावर व्हिडीओ शेअर करत केला. यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून आरोप फेटाळण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

'शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातोय', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget