नाशिक : महाराष्ट्रात 4 ते 12 सप्टेंबरपर्यंत पदयात्रा होणार असून यासाठी जय्यत तयारी सुरु असून आज पाच जिल्ह्याची बैठक झाली. जनसंवाद यात्रेदरम्यान दोन सभा होणार असून पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे प्रमुख लोक असतील, या पदयात्रेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली असून काँग्रेसचे दिवस चांगले येणार आहे, असं सगळीकडे ऐकायला मिळतं असल्याचे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.
आज बाळासाहेब थोरात नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच महाराष्ट्रात काँग्रेसकडून पदयात्रेचे आयोजन केले जाणार असून यासाठी विविध जिल्ह्यात बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते नाशिकला आले होते. यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, येणारा काळ हा काँग्रेसचा असून भारत जोडोला सगळ्यात जास्त प्रतिसाद हा महाराष्ट्रात मिळाला, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सांगितलं. एकट्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून 367 बसेस भारत जोडो यात्रेसाठी शेगावला आल्या होत्या. त्यावरून लक्षात येतंय की काँग्रेसला (Congress) अच्छे दिन येत आहेत. त्यानुसार कसबा, कर्नाटक आपण निवडणुकीत जिंकलो. कसब्यामध्ये दगड जरी उभा केला तरी निवडून येईल, असं तिथे भाजपचे मतदान आहे, पण याला आपण छेद दिला, असेही थोरात म्हणाले.
तसेच महाराष्ट्रात 4 ते 12 सप्टेंबरपर्यंत पदयात्रा होणार असून यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाच जिल्ह्याची बैठक झाली. जनसंवाद यात्रेदरम्यान दोन सभा होतील. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे प्रमुख लोक असतील, या पदयात्रेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली असून काँग्रेसचे दिवस चांगले येणार आहे, असं सगळीकडे ऐकायला मिळतं आहे. एकीकडे नाशिकमध्ये काँग्रेसच्या गोटात गटबाजीचे राजकारण पाहायला मिळत आहे. यावर ते म्हणाले की, हा मनाचा खेळ असून आमच्यात गटबाजी म्हणजे आमच्याकडे लोकशाही आहे. आम्ही एकत्र राहू आणि लढू असेही थोरात म्हणाले.
एकीकडे देशात दंगे घडविण्याच्या प्रयत्न केला जात असून जाती जातीमध्ये, धर्मामध्ये भांडण लावण्याचे काम केलं जातं आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. टोमॅटो आयात करत आहे, हे सगळे मुद्दे तुमच्याकडे आहे, हे भांडवल कस वापरायचे हे तुमच्या हातात आहे, कस नियोजन करायचे हे तुमच्या हातात आहे, मात्र शासन यावर काम करत नसल्याचे दिसते आहे. मात्र सद्यस्थितीत आम्ही पक्षाच्या संघटनांवर काम करत असून पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त चांगले काम करा, तसेच आगामी पदयात्रेचे आपल्या तालुक्यात विभागात काम कस करता येईल, याकडे लक्ष द्या, असा आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या...
अतिशय आनंदाची बातमी आहे. आपल्या देशासाठी गौरवाची बाब असून चांद्रयान मोहिम अखेर फत्ते झाली आहे. पंडित जवाहलाल नेहरू यांनी इस्त्रोची स्थापना केली. इंदिरा गांधी, नेहरू यांचा मोठा वाटा असून त्यांचे व्हिडीओ आजही उपलब्ध आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. तसेच कांदा प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, कांद्यावर कर लावणे चुकीचे असून शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर त्यांनी ते थांबावायला नको होतं. टोमॅटोचे भाव वाढले, तेव्हा आयात केली. केंद्राचे धोरण हे अन्यायकारक असून शेतकरी किंवा ग्राहकाला अनुदान द्या, शेतकऱ्यालातोट्यात किंवा अडचणीत आणून स्वस्ताई करण्याचा प्रयत्न हे चुकीचे आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत खरेदी सुरु केली, यात कांद्याला प्रतिक्विंटल 2410 रुपये भाव देण्यात येत आहे, मात्र शेतकरी नाराज असून उत्पादन खर्च निघणार नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी विनंती देखील थोरात यांनी केली.