ABP C Voter Survey: पुढील वर्षी देशात लोकसभेची निवडणूक होणार असून त्या आधी या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या दोन राज्यांतील निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी देश स्तरावर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशाच्या पुढील पंतप्रधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल?
या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 71 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले आहे. 4 टक्के लोक म्हणतात की या दोघांपैकी कोणीही नाही आणि 1 टक्के लोकांनी 'माहित नाही' असे उत्तर दिले आहे.
काय सांगतोय सर्व्हे? - मोदी आणि राहुल यांच्यात थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर कोणाला निवडाल?
नरेंद्र मोदी-71 %
राहुल गांधी - 24 %
दोन्हीही नाही - 4 %
माहित नाही - 1 %
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या दोन राज्यांतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी छत्तीसगडचा पहिला ओपिनियन पोल घेतला. 18 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात 7 हजार 679 लोकांशी चर्चा करण्यात आली आहे.
राजकीय तापमान वाढवले आहे. अशा वातावरणात सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी छत्तीसगडचा पहिला ओपिनियन पोल घेतला आहे. 18 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात 7 हजार 679 लोकांशी चर्चा करण्यात आली आहे. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन हे प्लस मायनस 3 ते 5 टक्यापर्यंत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजप विरोधात आता इंडिया या विरोधी पक्षांनी तयार केलेल्या आघाडीचीनेही चांगलीच कंबर कसली आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यासाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.
ही बातमी वाचा :