नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District) लाचखोरीने कळस गाठला असून दिवसाआड एसीबीच्या (ACB) पथकाकडून अधिकारी, कर्मचारी यांना अटक केली जात आहे. असं असताना देखील लाच घेताना इतर कचरताना दिसत नाही. अशातच एसीबीच्या जाळ्यात नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अडकले आहेत. त्यामुळे नाशिक ग्रामीण (Nashik Rural Police) पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल आरोग्य, शिक्षण त्याचबरोबर पोलीस प्रशासन (Nashik Police) देखील लाचखोरीच्या (Bribe) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शासनाकडून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अनेक विभागांमध्ये लाचखोरी सुरु असल्याचे अशा कारवायांमधून अधोरेखित झाले आहेत. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या पोलीस प्रशासनातही लाचखोरीची कीड बळावत चालली आहे. याच ताज उदाहरण म्हणजे येवला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. त्याचबरोबर सोबतच्या पोलीस शिपायाला देखील या प्रकरणी ताब्यात घेतेले आहे.
दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशन (Yeola Police) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून येवला शहर पोलीस स्टेशन येथे नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस कॉन्स्टेबल हे 50 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात जाळ्यात सापडले आहे. तक्रारदार याच्या भावावर दाखल गुन्ह्यात आणखी कलमे वाढवू नये ,यासाठी ही लाच मागितल्याचे बोलले जात आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि पोलिस शिपाई सतिश बागुल अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत.
50 हजार रुपये लाचेची मागणी
संशयित लाचखोर पोलीस दोघेही येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. येवला शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. तक्रारदाराचा भाऊ अटकेत असून, लाचेची मागणी सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलिस नाईक सतीश बागुल यांनी केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीमध्ये मारहाण करणार नाही, तसेच सदर गुन्ह्यात 307 वाढीव कलम लावण्याची भीती घालून लाचखोर सपकाळे आणि बागुल यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचखोर सपकाळेने गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल हिसकावला. तसेच त्यातील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :
Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर?