North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे अहमदनगरमध्ये जंगी स्वागत
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते अहमदनगरमध्ये दाखल झाले असून त्यांचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आज अहमदनगर जिल्ह्यात तीन सभा होणार आहेत.
भविष्यात काँग्रेसला खूप मोठं यश मिळणार : आमदार कुणाल पाटील
मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. मी काँग्रेस सोडणार याची चर्चा कुठून सुरू झाली हे माहिती नाही. अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. पण काँग्रेसचा विचार आम्ही समर्थपणे पुढे घेऊन जाऊ. काँग्रेसने असे अनेक धक्के पाहिले आहेत. पण काँग्रेस संपली नाही. भविष्यात काँग्रेसला खूप मोठं यश मिळणार यात काही शंका नाही. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने उद्या मुंबईच्या बैठकीला जाणार नाही, वेगळा अर्थ काढू नये, असे आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या तीन घटना
नाशिक जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. जिल्ह्यात तीन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नांदगाव मनमाड महामार्ग, नाशिकच्या सातपूर परिसरात आणि देवळाली कॅम्प परिसरात अपघात झाले आहेत.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर
उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई इथे थोड्याच वेळात येणार आहेत. याठिकाणी उध्दव ठाकरे यांची जनसंवाद सभा होणार आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले जाईल. जवळपास 20 जेसीबीमधून फुलांची उधळण केली जाणार आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने हे स्वागत केले जाणार आहे.