नाशिक : येथील शिंदे गावात (Shinde Village) असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला (Firecrackers godown) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस (Police) आणि अग्निशमन विभागाचे (Fire Brigade) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यात चार कामगार जखमी झाले असून दोन कामगारांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या गोडाऊनला एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये असलेले फटके एकामागे एक फुटत असल्याने परिसरात मोठमोठे आवाज येत आहे. तर धुराचे लोट आकाशामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे. 


आगीत चार कामगार जखमी


एक महिन्यावर दिवाळी असल्यानं गोडाऊनमध्ये फटाक्यांचा साठा जमा केला जात होता. गोदामात फटकांचा माल उतरविण्यासाठी ट्रक आलेला असताना आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीत चार कामगार जखमी झाले आहेत. पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग नियंत्रणात आल्यानंतर याबाबत पुढील चौकशी केली जाणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय


नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश