नाशिक : महात्मानगर (Mahatmanagar) परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी लागणारी औषधं आढळली आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाच्या (Health Department) पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील महात्मानगर सारख्या मध्यवस्तीतील खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी लागणारी औषधं आढळून आले आहेत. पंड्या हॉस्पिटलमध्ये (Pandya Hospital) हा प्रकार उघडकीस आला असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे.
रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन नाही
नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गंगापूर रोड पोलिसांनी पंड्या हॉस्पिटलवर संयुक्त कारवाई केली. एमबीबीएस डिग्री असताना गायनेकोलॉजीचे डॉक्टर करत होता. या रुग्णालयाचे कुठलेही रजिस्ट्रेशन नाही, महापालिका आरोग्य विभागाकडे या हॉस्पिटलची कोणतीही नोंद नाही. अवैध पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सुरु असल्याचे मनपाला लक्षात येताच कारवाईची बडगा उगारण्यात आला.
सखोल चौकशी होणार
डॉक्टरने गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा कुठून आणला? हे हॉस्पिटल किती दिवसापासून सुरू आहे. याबाबत आता सखोल चौकशी केली जाणार आहे. तर माझ्याकडे वैद्यकीय शिक्षणाचं प्रमाणपत्र आहे. त्यानुसार उपचार करत असल्याची माहिती संबंधित डॉक्टर आर. एन. पंड्या यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या