नाशिक : आडगाव हद्दीतील छत्रपती संभाजीनगर रोडवरील (Chhatrapati Sambhajinagar Road) कपालेश्वरनगर परिसरातील आलिशान निर्माण नक्षत्र इमारतीतील घरात एका महिलेने उच्चभ्रूसाठी वेश्या व्यवसाय सुरु ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघककीस आला आहे. याप्रकरणी पीसीबी एमओबीच्या पथकाने धाड टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसह एका दलालास पोलिसांनी (Police) अटक केली होती. आता या प्रकरणी एका राजकीय नेत्याला अटक केल्यानं नाशिकमध्ये (Nashik Crime News) मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या कपालेश्वरनगर परिसरातील आलिशान निर्माण नक्षत्र इमारतीत गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना याबाबत माहिती मिळाली की, एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करत आहे. त्यानुसार पथकाचे प्रभारी निरीक्षक डॉ. अंचल मुद्रल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. 


दोन पीडित मुलींची सुटका


वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजताच पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी संशयित कविता साळवे-पाटीलसह जाफर मन्सुरी यास अटक केली. दोघांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या तपासात दोघे संशयित पीडित मुलींना मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.  


राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ


यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता यात राजकीय नेता असल्याचे निष्पन्न झाले. नाशिकच्या क्राईम ब्रँचने आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागरला अटक केली आहे. पवन क्षीरसागरच्या आशीर्वादाने कविता साळवे पाटील कुंटनखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक करण्यात आल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे.


महिलेने थेट पोलिसांनाच दिले होते आव्हान


दरम्यान, या प्रकरणातील संशयित महिलेने इमारतीतील रहिवाशांना दमदाटी, शिवीगाळ केली होती. सायंकाळ झाल्याने पोलिसांनी संशयित महिलेस गुन्हा दाखल करून सोडले. त्यानंतर संशयित कविता साळवेने इमारतीच्या अध्यक्षांसह इतर फ्लॅट धारकांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच 'आता मी पुन्हा वेश्याव्यवसाय करेल, कोणाला काय करायचे ते करा' असे बोलून पोलिसांनाही घाबरत नसल्याचे सांगत आव्हान दिले होते. संशयित महिलेने दमदाटी, शिवीगाळ केल्याने इमारतीतील 60 ते 70 रहिवाशांनी संतप्त होत आडगाव पोलीस ठाण्यात जात तेथे ठिय्या देऊन कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच संशयित महिलेस पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. 


आणखी वाचा


Ahmednagar Crime News : अहमदनगरमध्ये भरदिवसा कांदा व्यापाऱ्यावर हल्ला, 50 लाखांची रोकड लुटून दरोडेखोर फरार, शहरात खळबळ