(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये आजपासून एंडयुरन्स लीग प्रीमियर म्हणजे घोड्यांची शर्यत
Nashik News : नाशिकमध्ये आजपासून एंडयुरन्स लीग प्रीमियरला सुरुवात होणार आहे. ही घोड्यांची शर्यत पहिल्यांदाच नाशिकमध्ये होणार आहे.
Nashik News : नाशिक शहराजवळील नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील ग्रेप काउंटी येथे आजपासून एंडयुरन्स प्रीमियर लीग म्हणजेच घोड्यांची शर्यत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये प्रथमच सादर होत असलेली अतिशय अनोखी स्पर्धा नाशिककरांना अनुभव मिळणार आहे
जिल्हा परिषद नाशिक, काउंटी रीच नाशिक, हॉर्स रायडर नेट लोणावळा व व्हेन्यू पार्टनर ग्रेप काउंटी रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एंडयुरन्स प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील 40 जणांचा समावेश असलेल्या आठ टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना एंडयुरन्स लीगची विशेष अनुभूती मिळणार आहे.
एंडयुरन्स लीग संदर्भात माहितीसाठी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे व काउंटी रँचचे संस्थापक समीर खान यांनी सांगितले की, सैन्यातील अश्व दलात महत्त्वाची भूमिका असो, तांड्याची वाहतूक असो, टांग्यातील सफर असो, घोड्याची शर्यत असो, पोलोसारखा खेळ असो किंवा रेसकोर्स मधील भरधाव वेग घोडा या नेहमीच लक्षवेधी आणि जिव्हाळ्याचा विषय ठरत असतो.
प्राचीन काळापासून वैभवाचे प्रतीक असलेल्या अश्व हा सध्या क्वचितच चर्चिला जाणारा विषय आहे. परंपरा संस्कृती जतन करताना आजच्या युवा पिढीला अश्वाचे महत्त्व कळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी आहे स्पर्धेची रूपरेषा
एंडयु रन्स प्रीमियर लीगचा मार्ग बावीस किलोमीटर इतका असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील द तेवीस कप या स्पर्धेच्या धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी 40 ते 50 स्पर्धकांचा समावेश असणारे एकूण आठ संघ हे संपूर्ण देशभरातून या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. आयोजकांनी सूक्ष्म नियोजन करताना नियमांच्या माध्यमातून स्पर्धकांनी बरोबरच होणाऱ्या आसवांच्या असून यासाठी आरोग्यदायी विशेष काळजी घेतली जाते कसे
असे आहे वेळापत्रक
शुक्रवार दिनांक 24 जून नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अश्वांचे आगमन व नोंदणी, शनिवार दिनांक 25 जून सकाळी नऊ ते बारा पर्यंत अश्वांची शर्यत पूर्वीची आरोग्य तपासणी, दुपारी तीन वाजेपासून पुढे स्पर्धेची माहिती व मार्गाचे अवलोकन आणि उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 26 जून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत एंडयु रन्स प्रीमियर लीग. दुपारी बक्षीस समारंभ
जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे म्हणाले की, अश्वाचे महत्व लोकांना कळावे हा क्रीडाप्रकार लोकांना माहीत व्हावा यासाठी लोकसहभागातून याची जनजागृती व्हावी या उद्देशाने अश्व या स्पर्धेचे आयोजन करत आहोत या माध्यमातून लहान मुलांना देखील या क्रीडा क्रीडा प्रकारांची गोडी लागेल याची आम्हाला खात्री आहे.