नाशिक : अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी त्यांची आई सत्यवती कौर (Satyawati Kaur Vidyalaya) यांच्या नावाने बांधलेल्या शाळेचे वादळी वाऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. मालेगाव (Malegaon) तालुक्यातील टोकडे (Tokade) येथील गावात ही शाळा बांधलेली असून आज झालेल्या वादळी वाऱ्यात शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांनी 1980 मध्ये ही शाळा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे (Dharmendra School In Tokade) गावात उभारलेली आहे. त्यावेळी मालेगाव तालुक्यात फिरत असताना त्यांनी टोकडे गाव पाहिले आणि या गावाच्या ते प्रेमात पडले. येथील ग्रामस्थांशी चर्चा करून गावात शाळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांची आई सरस्वती कौर यांच्या नावाने शाळा बांधली. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात या शाळेवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पावसाचे वातावरण झाले. तत्पूर्वी सोसाट्याचा वारा सुरू झाला. यात माध्यमिक विद्यालयाच्या छतावरील सर्व पत्रे वादळी वाऱ्यामुळे ऊडाले आहे. त्यातच पुढील काही दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शाळा सुरू होणार असल्याने झालेल्या या नुकसानीमुळे शिक्षक, ग्रामस्थ, परिसरातील पालक, विद्यार्थी यांची मोठी तारांबळ होणार आहे. शासनाने तातडीने मदत करून शाळा वेळेवर सुरू होण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
Dharmendra School In Nashik : काय आहे शाळेचा इतिहास?
अभिनेता धर्मेंद्र यांच्या सहभागामुळे टोकडे गावाचे रुप पालटले आहे. त्यांनी आई सरस्वती कौर यांच्या नावाने (Satyawati Kaur Vidyalaya) शाळा सुरु केली. आता याच गावात शहीद भगतसिंग (Shahid Bhagatsingh) यांचे स्मारक उभे राहत आहे. गावात धर्मेंद्र यांनी आईच्या नावाने शाळा सुरु करण्यासाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली.
धर्मेंद्र हे गावच्या प्रेमात पडल्याने ते गावातील रामनवमीच्या (Ram Navami) यात्रेला येत असत. ते गावात मुक्काम करत असत. गावातील मुलांनी शिकावे हा त्यांचा शाळेच्या उभारणीमागील उद्देश होता. शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रामनवमीला शाळेच्या उद्घाटनाचा झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र, अभिनेत्री हेमामालिनी, दारासिंग आणि त्यांचा परिवार उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होता. तेव्हा धर्मेंद्र यांची बैलगाडीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ही बातमी वाचा: