Dharmendra : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असून, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल सध्या धर्मेंद्रसोबत रुग्णालयात आहे.

धर्मेंद्र यांचे वय 86 असूनदेखील ते सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. धर्मेंद्र लवकरच 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'अपने' या सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. या सिनेमात धर्मेंद्रसोबत त्यांचा नातू करण देओल तसेच सनी देओलदेखील दिसणार आहे. धर्मेंद्र यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

संबंधित बातम्या

Virajas Shivani Wedding : शिवानी रांगोळेच्या हाताला लागली विराजस कुलकर्णीच्या नावाची मेहंदी

Maharashtra Shahir : शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' लवकरच येणार रुपेरी पडद्यावर

Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला