एक्स्प्लोर

Nashik MVP Marathon : नाशिक मविप्र मॅरेथॉनचा उद्या थरार, आशियाई हॉकी सुवर्णपदक विजेते मिर रंजन नेगी यांची प्रमुख उपस्थिती

Nashik News : 8 व्या राष्ट्रीय व 13 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा थरार रविवारी रंगणार आहे. यावेळी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले मीर रंजन नेगी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Nashik MVP Marathon नाशिक : 8 व्या राष्ट्रीय व 13 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा थरार उद्या रविवारी (दि.२८ जानेवारी) रंगणार आहे. यावेळी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले तसेच 'चक दे इंडिया' (Chak De India) चित्रपटाची प्रेरणा असणारे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मीर रंजन नेगी (Mir Ranjan Negi) हे २०२४ मॅरेथॉन स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. 

यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या (Nashik MVP Marathon) संयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आरोग्यमंत्री भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, स्पर्धा निरीक्षक वैजनाथ काळे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी पावणेसहाला मविप्र मॅरेथॉनला सुरुवात

रविवारी (दि. 28) सकाळी पावणेसहाला मविप्र मॅरेथॉन चौक येथून पूर्ण मॅरेथॉन स्‍पर्धेला सुरवात होईल. यानंतर टप्‍याटप्‍याने विविध गटांच्‍या धावण्याच्‍या शर्यती पार पडतील. सकाळी अकराला रावसाहेब थोरात सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. 

असा असेल मॅरेथॉनचा मार्ग

मविप्र मॅरेथॉन चौक येथून सुरू स्‍पर्धेला सुरुवात होणार आहे. धोंडेगावपर्यंत जाऊन पुन्‍हा मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग असेल. स्पर्धेसाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटीक्स मॅरेथॉन आणि रोड रेसेसच्या तांत्रिक नियमानुसार स्पर्धेचे अंतर कॅलीब्रेटेड बायसिकलचा वापर करून निश्चित करण्यात आले आहेत.

आठ रिफ्रेशमेंट पॉइंट

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन नियमाप्रमाणे पूर्ण मॅरेथॉनसाठी आठ रिफ्रेशमेंट पॉइंट उभारले जाणार आहेत. या ठिकाणांवर इलेक्ट्रॉल पावडर, मिनरल वॉटर, लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, मीठ पाणी अशा रिफ्रेशमेंटची व्यवस्था असेल.

सात स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था

तसेच स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय पाच रुग्‍णवाहिका, तज्‍ज्ञ डॉक्‍टरांची टीम व चाळी खाटांचे रुग्‍णालय आरोग्‍यसेवेसाठी तैनात असेल. फिजिओथेरपी महाविद्यालयातील डॉक्‍टरदेखील उपलब्‍ध असतील. सात लाख १६ हजारांचे एकूण पारितोषिके असणार आहेत.

असे असतील गट

खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन होईल. 21 किमीची अर्ध मॅरेथॉन असेल. महिलांसाठी दहा किमी अंतराची शर्यत असणार आहे. 27 वर्षाआतील मुले (5 किमी) व मुली (4 किमी), 19 वर्षाआतील मुले (10 किमी) व मुली (5 किमी), 25 वर्षाआतील मुले (12 किमी), मुली (6 किमी), 35 वर्षावरील महिला (5 किमी), ज्‍येष्ठ नागरिक पुरुषांसाठी (4 किमी) अंतराचा स्वतंत्र गट असणार आहे.  

आणखी वाचा 

Dilip Walse Patil : "नरेंद्र मोदी अन् अमित शाहांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात अनेक बदल"; दिलीप वळसे पाटलांचे स्तुतीसुमने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवारJay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget