'मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासू', दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात नाशिकमध्ये मनसे आक्रमक
इंग्रजी पाट्यांना काळे फासत मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.
नाशिक : मराठी पाट्यांच्या मुद्यावर मनसे (MNS On Marathi Patya) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात नाशिकमध्ये (Nashik News) मनसे आक्रमक झाली आहे. कॉलेज रोड परिसरात मनसेने आंदोलन केले आहे. इंग्रजी पाट्यांना काळे फासत मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे. येत्या दहा दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे खळखट्याक स्टाईलने उत्तर देईस असा इशारा देण्यात आला आहे.
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मनसे सध्या आक्रमक झाली असून नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात आज सकाळी 11.30 च्या सुमारास मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशाराही यावेळी मनसेकडून व्यापाऱ्यांना देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते.
मराठी पाट्या लावण्याची 25 नोव्हेंबर अंतिम मुदत
मराठी पाट्या लावण्याची 25 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सर्व शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापना मध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम 1948 अन्व्ये बंधनकारक आहे असे असतांना देखील नाशिक शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापना वर कुठलीही कार्यवाही महापालिकेकडून होताना दिसत नसल्याचाही आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला.
राज्यभरात मनसे आक्रमक
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. नसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.
हे ही वाचा :
MNS : दहा दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक स्टाईलने उत्तर देऊ; कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला मनसेचे अल्टिमेटम