एक्स्प्लोर

Narhari Zirwal : "अजितदादांचं घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही, फडणवीस साहेबही वेळ पाळतात, पण सीएम शिंदे"; नरहरी झिरवाळांची तुफान टोलेबाजी

Nashik Mahayuti Melava : राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. नाशिकमधील मेळाव्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

Nashik Mahayuti Melava नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत.  राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकच्या महायुतीच्या मेळाव्याला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत तुफान टोलेबाजी केली. 

23 जानेवारीला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच ठिकाणी महायुतीची समन्वय बैठक आयोजित कण्यात आली आहे. बैठकीला शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाजपकडून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले तसेच अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार उपस्थित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला शेवटी बोलायला आवडत नाही. कारण सगळे कंटाळलेले असतात. आजच्या बैठकीला जागा निवडली, ते नाव मला येत नव्हतं. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मोदी साहेबांचा आध्यात्मावर विश्वास आहे. उद्या मकर संक्रांत आहे, आपल्याला आता गोड बोलायचं आहे. आपण तिळगुळ देऊन जे गोड तोंड करू, ते कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचे नाव घेत तुफान टोलेबाजी  

माझ्याकडे अजित दादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. अजित दादांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही, फडणवीस साहेबही वेळ पाळतात. शिंदे साहेबांचे होतं पण ते सॉरी म्हणतात, अशी तुफान टोलेबाजी त्यांनी करताच सर्वत्र मेळाव्याला एकच हशा पिकला. 

आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच

४५ खासदार का? ४८ पैकीच्या पैकी का नको? उरलेले तीन धाकधूक होतील. आपण सर्व खासदार निवडून आणले पाहिजे. आता कधी नव्हे, एवढे पैसे प्रत्येकाला मिळाले आहेत. कर्जही घेऊ नका आणि विकास करा, असे कसे होईल? आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच,  असे त्यांनी म्हटले. तसेच बॅनरवर माझा पण फोटो असावा, असे प्रत्येकाला वाटते, असे झिरवाळ बोलल्यावर मंचावरील सर्व उपस्थित बॅनरकडे बघायला लागले होते.

भुजबळांनी फिरवली मेळाव्याकडे पाठ

नाशिकमध्ये होणाऱ्या मेळाव्याला  छगन भुजबळ अनुपस्थित आहेत. या मेळाव्याला छगन भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात असून देखील पाठ फिरवल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

आणखी वाचा

Nandgaon News : नांदगावात 20 दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही; महिलांचा रास्ता रोको, नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरसारखी प्रेमळ माणसं कुठंच नाहीत, तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर... नेमकं काय म्हणाले अशोक सराफ 
कोल्हापूरसारखी प्रेमळ माणसं कुठंच नाहीत, तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर... नेमकं काय म्हणाले अशोक सराफ 
Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅग न वापरणाऱ्यांसाठी नवा नियम
वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅग न वापरणाऱ्यांसाठी नवा नियम
Fact Check : रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपद शुभमन गिलला मिळताच, विराट कोहलीनं खिल्ली उडवणारी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली का? जाणून घ्या सत्य
रोहित शर्मा विरोधात खरंच विराट कोहलीनं इन्स्टावर स्टोरी ठेवली का? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूरसारखी प्रेमळ माणसं कुठंच नाहीत, तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर... नेमकं काय म्हणाले अशोक सराफ 
कोल्हापूरसारखी प्रेमळ माणसं कुठंच नाहीत, तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर... नेमकं काय म्हणाले अशोक सराफ 
Samsung New 4G Phone Launch : Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
Samsung चे तीन नवीन स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरेच काही!
वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅग न वापरणाऱ्यांसाठी नवा नियम
वाहनधारकांना मोठा दिलासा, टोलवर UPI ने पेमेंट केल्यास होणार फायदा; फास्टटॅग न वापरणाऱ्यांसाठी नवा नियम
Fact Check : रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपद शुभमन गिलला मिळताच, विराट कोहलीनं खिल्ली उडवणारी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली का? जाणून घ्या सत्य
रोहित शर्मा विरोधात खरंच विराट कोहलीनं इन्स्टावर स्टोरी ठेवली का? जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य
Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
Shubman Gill : बीसीसीआयनं वनडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली, शुभमन गिल पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, आमचं अंतिम ध्येय...
भारताचं नेतृत्व करणं हा सर्वोच्च सन्मान, वनडेचं कर्णधारपद मिळताच शुभमन गिलची भावना
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण
गौतमी पाटीलवर कारवाई करता येणार नाही; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या फोननंतर पोलीस उपायुक्तांनी सांगितलं कारण
Embed widget