(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik VBA : छगन भुजबळांकडून जातीपातीच राजकरण, माफी मागा, अन्यथा कार्यक्रम होऊ देणार नाही, वंचितचा इशारा
Nashik News : छगन भुजबळ यांनी बहुजन समाजाची माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
नाशिक : 'मंत्री छगन भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या फाळके स्मारकावर बोधिवृक्ष फांदी लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच या कार्यक्रमाचे आयोजक पद भूषवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे जाणारे रोपण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या महोत्सवास राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचितकडून पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर आक्षेप घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्ह्णून छगन भुजबळ हे काम पाहत असून या गोष्टीला आमचा विरोध असल्याची भूमिका वंचितकडून व्यक्त करण्यात आली आहे. बहुजन समाजाची माफी मागा, अन्यथा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा वंचितकडून देण्यात आला आहे.
पालकमंत्री दादा भुसे असताना....
तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे असून त्यांच्याकडे बोधीवृक्षाच्या फांदीरोपण सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपविणे गरजेचे होते. मात्र छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल वंचितने उपस्थित केला. विजयादशमीला त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेऊन ते मराठा समाजाच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करीत आहेत. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याच दिवशी जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख संपत आहे. त्यामुळेच त्याचदिवशी असलेल्या बोधीवृक्ष फांदीरोपण महोत्सव कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही ना? अशी शंका देखील वंचित बहुजन आघाडीकडून उपस्थित करण्यात आली आहे.
बोधिवृक्ष फांदीरोपण करू देणार नाही...
नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे केले जाणारे रोपण याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरला दिलेला अल्टिमेटम आणि त्याच दिवशी मंत्री भुजबळ यांच्या नियोजनाखाली बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून येणारे मान्यवर व उपासक बघता दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप वंचितने केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण भेटलेच पाहीजे, ही आमची रास्त भूमिका असुन भुजबळ यांना कुठलाही सपोर्ट किंवा पाठींबा नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे. भुजबळ यांनी दलित समाजाची माफी मागितल्याशिवाय त्यांना बोधिवृक्ष फांदीरोपण आम्ही करू देणार नाही हे संबंधित यंत्रणांनी लक्षात असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :