Nashik : 'तू रात्री म्हणाली होती गूडबाय, पण आता मी तुला गूडबाय करतो', पत्नीला मॅसेज करत तरुणानं स्वतःला संपवलं!
Nashik news : पत्नीला मेसेज करून तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आली आहे.
नाशिक : हल्ली आत्महत्यांचे (suicide) प्रमाण वाढत चालले असून कौटुंबिक वाद महत्वाचे कारण समोर येत आहेत. पती पत्नीमध्ये वाद हे होतंच असतात. मात्र अनेकदा वादातून टोकाचा निर्णय घेतला जात आहे. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. ‘मी जात आहे, तू मला रात्री म्हणाली होती गूडबाय, आता मी तुला गूडबाय करतो आणि हा शेवटचा गूडबाय आहे’, असा मेसेज पत्नीला सोशल मीडियावर (Social Media) करून जुन्नरच्या तरुण मजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन निलेश पवार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अर्जुन पवार हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कौटुंबिक वादातून त्याने मंगळवारी सायंकाळी 5 वाजेदरम्यान मोबाईलवरून (mobile) पत्नीस उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली. त्यामध्ये त्याने मी जात आहे, तू मला रात्री म्हणाली होती गूडबाय, आता मी तुला गूडबाय करतो आणि हा शेवटचा गूडबाय आहे. त्यानंतर तो सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान मोबाईल बंद करून घरातून निघून गेला. तो परत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला पण कोठेही आढळून आला नाही. गुरुवारी सायंकाळी 5 वाजेदरम्यान पुणे राेडवरील नांदूर शिंगोटे शिवारातील वनीकरणाच्या एका झाडाला अर्जुन पवारचा मृतदेह गळफास घेतलेल्या (Suicide) अवस्थेत आढळून आला. वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police station) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस अंमलदार ए. व्ही. महाजन करत आहेत.
दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक वाद टोकाला गेल्याचे निदर्शनास आले आहे. कौटुंबिक वादाच्या तक्रारी हल्ली वाढत असून यातून पती पत्नी, इतर कुटुंबामध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून अनेकदा अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे वेळीच समुपदेशन करणे गरजेचे असते. अन्यथा या वादातून टोकाचा निर्णय कुटुंबातील सदस्य घेण्याची शक्यता असते.
लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या
नाशिक शहरातील सीबीएस परिसरात असलेल्या लॉजमध्ये एका तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने सीबीएसनजीकच्या लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. शुभम प्रल्हाद गोळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण निफाड तालुक्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. शुभमकडे बनावट शासकीय ओळखपत्र आढळले असून, त्याने शासकीय नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
इतर महत्वाची बातमी :