एक्स्प्लोर

'भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपानं ओवाळणी दे'; नाशिकमधून दोन हजार राख्या पाठवत भगिनींची आर्त हाक

Nashik News : राखी पौर्णिमेच्या (Rakshabandhan) सणानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्यात येत आहे.

नाशिक : राज्यात एक नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनचा (Old Pension) प्रश्न धगधगत ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यात आता भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेच्या (Rakshabandhan) सणानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री (eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांना राखी पाठवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 'नको ओवाळणी नको खाऊ आम्हाला जुनी पेन्शनच हवी भाऊ' असा संदेश त्या देत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातून जवळपास दोन हजार अधिक महिला कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला आहे.

जुनी पेन्शनकडे शासनाचे (Maharashtra Old Pension)  लक्ष वेधण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि राज्यातील सर्व महिला पेन्शन फायटर रक्षाबंधनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 28 ऑगस्टपासून ओपीएस राखी अभियानांतर्गत राख्या पाठवत आहेत. हे अभियान 6 सप्टेंबर पर्यंत राबवले जाईल. या माध्यमातून राज्यातील महिला कर्मचारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ओवाळणी म्हणून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत आहेत. हे आगळे वेगळे अभियान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून राबवले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांनी देखील या अभियानात सहभाग नोंदवत मुख्यमंत्र्यांना 1800 हून अधिक राख्या पाठवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा हा अनोखा उपक्रम आहे. राखी पाकिटावर 'नको ओवाळणी, नको खाऊ.. जुनीच पेन्शन हवी भाऊ....' असा संदेश लिहिण्यात येत आहे. नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त, राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असून डीसीपीएस योजना आणण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या स्वरूपातील आंदोलनांच्या माध्यमातून लढा देत आहेत. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे लढ्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे साकडे राज्यातील महिला निवृत्ती वेतनधारक करीत आहेत. 

ओवाळणी म्हणून जुनी पेन्शनच हवी

यंदा रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून जुनी पेन्शनच हवी, असा हट्ट महिला कर्मचारी सत्ताधारी करणार आहेत. रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाची काठी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, हीच खरी आमच्यासाठी ओवाळणी ठरेल, असे राज्यातील महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जुनी पेन्शन हा आमचा अधिकार असून त्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत. आता रक्षाबंधनाच्या औचित त्यावर आमच्या संघटनेतील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या राख्या पाठवून जुनी पेन्शनकडे साकडे घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री खाली हात पाठवणार नाहीत.... 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील आपल्या लहानग्या कर्मचारी भगिनींना खाली हात पाठविणार नाहीत. पेन्शन कर्मचाऱ्यांचा संवैधानिक अधिकार व म्हातारपणाची काठी आहे. तो अधिकार शिंदे हे पुन्हा मिळवून देतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून रक्षाबंधननिमित्त राज्यातील विविध विभागातील एनपीएस धारक महिला 'कर्मचारी राख्या पाठवत आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित होण्यासाठी जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री देतील, अशी लाखो बहिणींची आशा असल्याचे महिला शिक्षिकेने सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट? शुभ मुहूर्त कोणता?; जाणून घ्या पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याकडून राखी बांधण्याची तिथी व वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Embed widget