एक्स्प्लोर

Nashik Navratri : नाशिकमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी सुरू; मुर्तीकारांचा देवी मुर्तीवर अखेरचा हात, पाचशे रुपयांपासून ते 21 हजारांपर्यंत दर 

Nashik News : नाशिकच्या मालेगावात (Malegaon) कारखान्यातील देवींच्या मुर्तींवर अखेरचा हात मूर्तिकारांकडून फिरवला जात आहे.

नाशिक : सध्या नवरात्रोत्सवाची (Navratri 2023) तयारी जोरदार सुरू असून अवघ्या काही दिवसांत नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात होणार आहे. नाशिकच्या मालेगावात (Malegaon) कारखान्यातील देवींच्या मुर्तींवर अखेरचा हात हे मुर्तीकार फिरवणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मुर्तींच्या किंमतींमध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून पाचशे रुपयांपासून ते 21 हजार रुपयांपर्यंत देवीच्या मुर्तींच्या किमती पहायला मिळत आहेत. यात सर्वाधिक पसंती सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi) मुर्तीला मिळत आहे. 

गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी घराघरात नवरात्रीच्या दिवसांत लहान मूर्ती बसवल्या जातात. तर अनेक मंडळ देखाव्याबरोबरच देवीच्या विलोभनीय मूर्ती बसवत असतात. यासाठी गेल्या महिनाभरापासून देवीच्या मुर्ती तयार करण्यात येत आहेत. सध्या नाशिकच्या मालेगावमध्ये मुर्तीकारांची देवीच्या मुर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा देवीच्या मुर्तीच्या किमंतीमध्ये तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालेगावात अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा देवीच्या मूर्ती तयार करण्यात येत असून नाशिकसह (Nashik) इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) अनेक भागात मुर्ती बनविण्याचे काम सुरु असून देवीच्या मुर्तींवर कारागीर अखेरचा हात फिरवत आहेत. घरगुती देवी मुर्ती तयार झाल्या असून, मोठ्या मुर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या रविवारी नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार असून त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मुर्तीकारांकडून देवीच्या मुर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. मालेगावात अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा देवींच्या मुर्ती तयार करण्यात येत आहेत. नाशिकसह इतर जिल्ह्यातही या मुर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे आता अनेक मंडळांमध्ये तयारीला वेग आला आहे. आगामी पाच सहा दिवसात शेवटचं कामही पूर्ण होणार आहे. साधारण 8 इंचापासून 7 फुटापर्यंत देवी मूर्ती साकारण्यात येत आहेत. तर 500 रुपयांपासून ते  21 हजारपर्यंत दर आहेत. यात सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मुर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागातही नवरात्रीचा उत्साह

अलीकडे शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जाते. देखावे उभारण्याबरोबरच दांडिया गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो.  तसेच यंदा मूर्तिकारांकडून सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीस सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ दुर्गा देवीची मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सध्या दोन, पाच ते पंचवीस हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवास होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच पूर्वी ग्रामीण भागातील तरूण वर्ग गरबा खेळण्यासाठी शहरी भागांकडे येत होता. परंतु, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जात असल्याने ठिकठिकाणी गरबा आकर्षण राहणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik News: सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय; नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर देवीचे 24 तास दर्शन, भाविकांसाठी पर्वणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Smita Thorat On Rohit Patil  : रोहित पाटलांच्या प्रचारात बहीण स्मिता थोरातही सहभागीABP Majha  Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget