एक्स्प्लोर

Transit Treatment Center : उत्तर महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव उपचार केंद्र; नाशिकच्या म्हसरूळला उभारलं, काय आहेत वैशिष्ट्ये?

Nashik News : नाशिक शहरात तब्बल एक हेक्टर परिसरात वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात आले असून वन्यप्राण्यांवर उपचार करणे सोयीस्कर होणार आहे. 

नाशिक : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागांत वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी (wildlife) पोषक वातावरण असल्याने बिबट्यासह अनेक वन्यप्राणी आढळून येतात. मात्र अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांच्या मृत्यूत (Animal Death) वाढ होत असल्याचे चित्र आहे. कधी वन्यप्राणी मानवी संघर्ष, तर कधी रस्ता ओलांडताना तर कधी आजारी असल्याने अनेकदा वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात तब्बल एक हेक्टर परिसरात वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच वन्यप्राण्यांवर उपचार करता येणे सोयीस्कर होणार आहे. 

नाशिक आणि बिबट्या (Leopard) हे जणू समीकरण बनले आहे. बिबट्याबरोबर इतरही प्राणी पक्षी जिल्ह्यात आढळून येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी केंद्र असणे आवश्यक होत. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकजवळ वन्यप्राणी उपचार केंद्र (Transit Treatment Center) उभारावे अशी मागणी होती. अखेर नाशिकजवळील म्हसरूळला (Mhasrul)  वन्यप्राणी उपचार केंद्र अर्थात ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटरची उभारणी नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आली आहे. पुण्यातील उपचार केंद्राच्या धर्तीवर नाशिकमध्ये जखमी वन्यप्राण्यांवर उपचाराचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच या केंद्राचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह निफाड (Niphad), सिन्नर, येवला भागात वन्यजीवांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेले वन्यप्राण्यांचे अपघात आणि जखमी प्राण्यांच्या घटनांचे नियोजन करताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ होत होती. अशावेळी जखमी वन्यप्राण्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बिबट्यांसह मुक्ताईनगर, जळगाव, यावलसह सातपुड्यातील वाघांना नाशिकमध्ये उपचार घेता येतील. म्हसरूळ परिसरात उभारलेल्या उपचार केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे, एमआरआय कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधालयअसे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार आणि बचाव साहित्यासाठी कक्ष असतील. मृत वन्यजीवांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. या केंद्रात बिबट्यांसाठी 4 कक्ष, लांडगे, कोल्ह्यांसाठी- 5 कक्षांसह वाघांसाठी एक स्वतंत्र कक्ष असतील. विविध प्रजातीच्या पक्ष्यांसाठी 25 कक्ष असतील. माकड,वानरांसाठी-2 कक्ष असतील. तसेच केंद्रात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल.

केंद्र चालविण्यासाठी संस्थांना आवाहन 

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून नाशिकच्या म्हसरूळ परिसरात वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्ह्यासह विभागातील जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात याचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. या केंद्राचे दैनंदिनन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी वनविभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक संस्थांची  निवड करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र शासन वनविभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र वन विभागामार्फत पायाभूत सुविधा पुरविल्या जातील, तर इच्छुक पक्षाकडून सेवा पुरविल्या जातील. किमान 10 वर्षांसाठी हा करार असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sudhir Mungantiwar : सह्याद्रीच्या रांगांमध्ये आता वाघांचं दर्शन होणार; चंद्रपूर जिल्ह्यातील 8 वाघ सह्याद्री परिसरात सोडणार असल्याची वनमंत्री मुनगंटीवारांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्तनालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget