नाशिक : नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2023) पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या (Terrorist) संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. आयबी आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली आहे. मनमाडमध्ये (Manmad) गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशयावरून त्यास ताब्यात घेण्यात आले होते. 


राज्यभरासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganesh Chaturthi) आगमन झाले असून गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. मनमाड शहरात ही कारवाई करण्यात आली असून सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल असताना एक संशयित शहरातील गणेश मंडळाचे चित्रीकरण करत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. हा संशयित चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना येवला (Yeola) तालुक्यातील नगरसुल येथून त्यास ताब्यात घेतले होते. मध्यरात्री चौकशी करून सोडून दिल्याची माहिती आहे. 


दरम्यान राज्यभरात गणरायाच्या (Ganpati Bappa Morya) आगमनाचा उत्साह असून लाडक्या गणरायाचे काल घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आगमन होत आहे. याच (Nashik Ganeshotsav) पार्श्वभूमीवर राज्यभरातील महत्वाच्या नाशिक शहरासह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्तासह दहशतवादी विरोधी पथक देखील तैनात करण्यात आले आहे. 


मनमाड शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामुळे शहरभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच शहरातील एका गणेश मंडळाच्या आजूबाजूला एकाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. या संशयिताने शहरातील एका गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचे तपास यंत्रणाच्या लक्षात आले. त्यावरून हा संशयित ट्रेनने जात असताना त्यास नगरसूल येथून आयबी आणि एटीएसने ताब्यात घेत चौकशी केली. मात्र चौकशीनंतर त्यास सोडून देण्यात आले. आज पहाटेपर्यंत कारवाई सुरू होती. 


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क 


गेल्या काही महिन्यात नाशिक जिल्ह्यातून अनेक संशयितांना ताब्यात घेत कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे. मालेगाव परिसरात एटीएस, एनआयएची कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस सतर्क असून पोलिसांसह विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. यासाठी विविध पोलिसांची कुमक ठिकठिकाणी तैनात असणार आहे. शहरात साधारण 40 ते 50 सार्वजनिक गणेश मंडळे असून कोणतीही घटना घडू नये, यासाठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. यासाठी शहरात 3000 पोलीस अंमलदारांसह जिल्ह्यात 500 कर्मचारी व अतिरिक्त पथकांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये नियमित पोलीस ठाण्यांसह दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि दहशतवाद विरोधी पथकाचाही समावेश आहे. जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास पोलीस कारवाई करणार आहेत.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Ganesh Chaturthi : गणपती बाप्पा मोरया...नाशिक शहरात घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन, शहरभर गणेशाचे थाटात स्वागत