एक्स्प्लोर

Nashik drug Factory : उडता नाशिक! मुंबई पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांची जबरदस्त कामगिरी, कोट्यवधींचा ड्रग्जचा साठा जप्त

Nashik Crime : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पाठोपाठ नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली (Drug Racket) मोठी कारवाई केली आहे.

नाशिक : नाशिकमधून (Nashik) 300 कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त करण्यात आलेले असताना आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पाठोपाठ नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली (Drug Racket) मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्यभरात नाशिकमधून ड्रग्ज पुरवठा केला जात होता की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

नाशिक येथील ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasun Hospital Pune) फरार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साकीनाका पोलिसांनी नाशिकच्या (Nashik) शिंदे गावात एमडी हा अंमली पदार्थ (MD Drug) तयार होणारा कारखाना उध्वस्त करून जवळपास 300 कोटींचा साठा ताब्यात घेतला होता. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या  (Nashik Police) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या कारवाईला काही तास उलटत नाही तोच नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने शिंदे गावातील एका हॉटेल जवळ असलेल्या जाधव नामक व्यक्तीच्या गोडाऊनवर छापा टाकून एमडी ट्रक व कच्चा माल जप्त केला आहे. या कारवाईने नाशिकमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता समोर येत आहे. नाशिकरोड पोलिसांच्या पथकाने पुन्हा त्याच गावात एका कारखान्यात ड्रग्स व काही कच्चा माल जप्त करून कारखाना उध्वस्त केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या ड्रग्जचा नाशिकच्या भागातून पुरवठा होत होता की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार  झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक गाठले. या परिसरात तपास सुरु असताना शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिंदे गावात (Shinde Village) ड्रग्जची फॅक्टरीच सापडली. ज्या फॅक्टरीमध्ये एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात होती. शेकडो कोटी रुपयांचं ड्रग्स आणि ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आलेला होता आणि दुसऱ्याच दिवशी शिंदे गावांमधील जिथे अगदी हाकेच्या अंतरावर रहिवाशी वस्ती आहे, अशा ठिकाणी एक शेड टाकण्यात आलेल होता. त्या शेडमध्ये ड्रग्जचा आणि त्याचबरोबर ड्रग्जसाठी लागणाऱ्या विविध रसायनांचा कच्च्या मालाचा मोठा साठा जमा करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. तो साठा नाशिक पोलिसांनी जप्त केला असून नवीन एक अड्डा तयार करण्यात आलेला होता, तो देखील वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार नष्ट करण्यात येत आहे. 

नाशिक हे ड्रग्जचे उगमस्थान आहे का? 

एकूणच या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायन होती, ती रसायन एकत्रित केली जात होती, त्याचं मिश्रण केलं जात होतं आणि त्याच्या माध्यमातून ड्रग्जची निर्मिती केली जात होती. नाशिक पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार शेकडो कोटी रुपयांचा साठा असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता केवळ हेच एक ठिकाण आहे का आणखी कुठे कुठे अशा स्वरूपाचे ड्रग्ज ठेवण्यात आलेले आहेत. राज्यभर जे ड्रग्जचे जाळ पसरलेले आहे, त्याचं उगमस्थान हे नाशिक आहे का? हा ही प्रश्न उपस्थित होतो आहे. मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये ड्रग्ज वितरण होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. ड्रग्ज माफिया म्हणून ओळख असलेला ललित पाटील हा चार दिवसापासून पुणे पोलिसांच्या हातातून पसार झालेला आहे, त्याचा भाऊ नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मिती करत होता. त्याच भावाच्या ड्रग्ज निर्मितीच्या मुंबई पोलिसांनी छापेमारी केली होती, आता त्याच्याच दुसऱ्या एका कारखान्यावर नाशिक पोलिसांनी धाड टाकली असून येथूनही लाखोंचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकूणच नाशिक हे ड्रग्जचे उगमस्थान आहे का? नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात आहे का? याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण एक मोठं रॅकेट आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik News : ललित पाटीलच्या भावाचा नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना, कोट्यवधींचा कारखानाच उध्वस्त, मुंबई पोलिसांची कामगिरी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget