एक्स्प्लोर

Aditya Thackeray in Nashik : 'बळीराजाचं दुःख बोलून मोकळं होण्याइतकं सोपं नाही', आदित्य ठाकरे यांचा दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद 

Nashik Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नाशिक : 'आधी उन्हाचा रखरखाट आणि आता रिमझिम पाऊस...ज्याचा शेतीला काहीच फायदा नाही. या महासंकटात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. कांदा, टोमॅटोच्या (Tomato) नुकसानाची शासन दरबारी दखलसुद्धा घेतली जात नाही. हीच परिस्थिती आज निफाड तालुक्यातील भेंडाळी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना समोर आली. माझ्या बळीराजाचं हे दुःख बोलून मोकळं होण्याइतकं सोपं नाही, असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारला विचारला आहे. 

राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर छत्रपती संभाजी नगरमध्ये (Sambhajinagar) त्यांनी काल दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते नाशिकच्या (Nashik) ग्रामीण भागात दुष्काळी पाहणी दौरा करण्याकरता पोहोचले. नाशिकच्या परिसरातील शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची (Nashik Rain) आवश्यकता आहे. अनेक ठिकाणची पिके पावसाअभावी जळून गेली आहे, उरले सुरले पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळल आहे. अशा संकटकाळात बळीराजाला मजबूत पाठबळ हवंय आणि आम्ही ते देणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी आज सकाळपासून दौऱ्याला सुरवात केली. यात सुरवातीला निफाड (Niphad) तालुक्यातील भेंडाळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याबाबत शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी विनंती केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आपण पहातोय की पाऊस नसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बोलून मोकळं व्हायचं अशी भूमिका घेत आहेत, पण जनतेचे पण कान उघडे आहेत, मग शेजारच्या लोकांनी माईक चालु असल्याचे सांगत, जास्त बोलू नका' असा सल्ला दिला. ही जी वृत्ती आहे ना, की आपल्याला जो मोठे करतो, आपल्यासोबत राहून सगळं काही देतो, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून निघून जायचं, ही वृत्ती जनतेने ठेचून काढली पाहिजे, पण घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असही ठाकरे यावेळी म्हणाले. 

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ... 

राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी काल दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर ते नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळी पाहणी दौरा करण्याकरता पोहोचले. नाशिकच्या परिसरातील शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सकाळी ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील भेंडाळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची पाहणी केली. त्यानंतर सिन्नर (Sinner) तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील भात पिकांसह टोमॅटो पिकाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Aditya Thackeray : पावसाची पाठ, बळीराजा संकटात, आदित्य ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर, असा असेल दौरा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget